आपल्या भावना कायम चांगल्या असुद्या :

आपल्या भावना कायम चांगल्या असुद्या :आपल्या प्रत्येकाकडे कोणत्याना कोणत्या क्षेत्रात प्राविण्य हे आपल्या जन्मापासूनच असते
आपल्या भावना कायम चांगल्या असुद्या :
आपल्या भावना कायम चांगल्या असुद्या :

पण मोठे झाल्यावर आपण समाज आणि घरचे काय बोलतात त्याकडे 
जास्त लक्ष देतो आणि कधी कधी इच्छा नसून देखील नकळतपणे दुसऱ्या 
क्षेत्रात जातो
परंतु चिंता करण्याचे काहीच कारण नाहीआपण आजही 
तुम्हाला ज्या क्षेत्रात रस आहे त्या क्षेत्रावर सर्व शक्ती एकाग्र कराहा 
विचार मनातून पूर्णपणे काढून टाका की आता खूप उशीर झाला आहेमाझे वय निघून गेले आहे.

तुम्हाला ज्या क्षेत्रात प्राविण्य मिळवायचे असेल त्याची पूर्णपणे माहिती 
नव्याने गोळा करा आणि तुम्हाला जमेल तेंव्हा वेळात वेळ काढून तुमच्या आवडत्या कामात यश मिळेपर्यंत सतत कार्य करीत राहा  यशाबद्दल 
आणि तुमच्या मेहनतीबद्दल मनामध्ये जराही शंका घेऊ नकाएक गोष्ट कायम लक्षात असू द्या तुमच्या समोर जो आदर्श असेल त्यानुसारच 
तुमचे जीवन घडेलतुमच्यासमोर जे काही ध्येय तुम्ही ठेवले असेल 
त्यानुसारच तुमच्या भावना तुमच्या चेहऱ्यावर दिसतीलकारण आपण काहीही लपवू शकतो पण मनातील भावना नाही त्या चेहऱ्यावर प्रकट होतातचआणि हाच निसर्ग नियम सुद्धा आहेम्हणूनंच आपण नेहमीच 
आपल्या डोळ्यासमोर उच्च आदर्श ठेवला पाहिजे

आपल्या मनातील विचार परिस्थिती कशीही असो हे नेहमीच उच्च असले पाहिजेतमाझा संबंध हा कायम उज्वल आणि आनंदी आयुष्य 
जगण्यासाठीच आहे असे कायम मनाला बजावत राहामाझ्या हातून 
नेहमीच चांगले कार्य होत आहे असे मनाला सतत सांगत राहामी 
जनकल्याणाचेच काम करणार आहे असा विचार मनात असू द्यातुमची प्रगती कशी होईल ह्यावर कायम लक्ष केंद्रित करानेहमीच यशस्वी 
व्यक्तींचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवात्यांचे चरित्र वाचाते पुन्हा पुन्हा आठवाह्यामुळे तुम्हालादेखील तुमचा मार्ग स्पष्ट दिसून येईल
असे विचार जर मनात असतील तर ते आपोआपच तुमच्या चेहऱ्यावर 
देखील तसेच चांगल्या रीतीने उमटतीलकारण आपले विचार हे लगेचच आपल्या चेहऱ्यावर उमटतातह्याचा प्रत्यय आपण कदाचित अनेक वेळा घेतलाही असेलचांगला मूड असेल तर समोरची व्यक्ती आपसूकच 
म्हणते " आज फार आनंदात दिसताय ", आणि जेंव्हा आपले विचार 
नकारात्मक असतात तेंव्हा आपला चेहरा पाहून " आज काही प्रॉब्लेम आहे का? " असे विचारले जातेजर विचार चांगले असतील तर ते आपल्या 
चेहऱ्यावर आपोआप दिसून येतील,  म्हणूनच म्हणतात ना आपल्या प्रत्येक भावना ह्या आधी चेहऱ्यावर 
दिसतातखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या