श्रद्धा, प्रेम आणि सत्यता ह्यांचाच अखेर विजय होतो.

श्रद्धा, प्रेम आणि सत्यता ह्यांचाच अखेर विजय होतो.   तुमचे जीवनातले ध्येय काहीही असो, त्या ध्येयाबरोबरच मनामध्ये कायम ईश्वराबद्दल नेहमीच श्रद्धा बाळगा. तो नेहमीच तुमचे भले करणार ह्यावर अतूट विश्वास असुद्या.

श्रद्धा, प्रेम आणि सत्यता ह्यांचाच अखेर विजय होतो.
श्रद्धा, प्रेम आणि सत्यता ह्यांचाच अखेर विजय होतो.   

श्रद्धा आणि प्रेम हयाबरोबर अजून एका गोष्टीची फार नितांत गरज आहे आणि ती म्हणजे आपली तत्वे आणि त्यांची सत्यता.
तुम्ही कोणतेही व्यवहार करा पण ते नेहमीच सत्यावर आधारित असले पाहिजेत. तुम्ही तुमच्या ध्येयाच्या मार्गावर सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. इतिहास साक्षी आहे, ज्यांनी कायम सत्याची कास धरून ध्येयाकडे मार्गक्रमण केले त्यांना त्यांच्या आयुष्यात भव्य दिव्य यश मिळाले आहे.

तुम्हीसुद्धा सत्याची कास धरून काम केलेत तर तुम्हाला आयुष्यात जे हवे आहे ते सर्व मिळेल. जर आपल्याला समाजात मान हवा असेल, सर्वांनी आपल्याला विचारात घ्यावे असे वाटत असेल तर मग कायम आपल्या मनाला हे सांगत राहा की मी एक आदर्श व्यक्ती आहे, आणि तसा कायम विश्वास बाळगा. त्यामुळे आपोआपच तुमच्या अंतरंगात एक अलौकिक शक्ती उत्पन्न झाल्याचे तुम्हाला स्वतःलाच जाणवेल.

ध्येयाकडे वाटचाल करत असताना कोणतेही आणि कसेही प्रसंग आले तरी तुम्ही तुमचे ध्येय कधीही तुमच्या नजरेआड होऊ देऊ नका. ध्येयासाठी संपूर्ण तन आणि मन एकत्र करून मेहनत करा. आपल्या प्रत्येकाकडे एक अलौकिक सामर्थ्य आहे, पण ते कसे वापरायचे हे आपल्याला माहित असायला हवे, तुमचे सामर्थ्य कशात आहे ते आधी ओळखायला शिकले पाहिजे. आपले सामर्थ्य आपण जर पूर्णपणे वापरले तर आपण कोणत्याही परिस्थितीला सहजपणे तोंड देऊ शकतो. म्हणून आपण आपले सर्व सामर्थ्य आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापरले पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीमधून आपण आपले सामर्थ्य वापरले पाहिजे आणि त्याला प्रखर इच्छाशक्तीची जोड द्यायला पाहिजे. आपल्या ध्येयासाठी आपल्यात असलेले सर्व सामर्थ्य आपण एकाग्र केले पाहिजे. मी माझ्या ध्येयाकडे योग्य दिशेने  आणि सातत्याने प्रगती करत आहे असे सतत मनाला बजावा. असे केल्याने इच्छित ध्येय आपल्याला नक्कीच प्राप्त होईल ह्यात तिळमात्र शंका नाही. 

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:  आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या