योग्य निश्चय आणि परिश्रमाने यश मिळतेच :

योग्य निश्चय आणि परिश्रमाने यश मिळतेच :जगातील प्रत्येक माणसाच्या मनामध्ये कोणत्या ना कोणत्या इच्छा ह्या असतातच. 

योग्य निश्चय आणि परिश्रमाने यश मिळतेच :

योग्य निश्चय आणि परिश्रमाने यश मिळतेच :


पण अनेक माणसे स्वतःच्या इच्छांना आपल्या केवळ विचारांनीच दुबळे बनवतात. इथे एक गोष्ट आपण कायम स्मरणात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे नुसती इच्छा असून उपयोग नाही तर त्या इच्छे बरोबर दृढ निश्चय आणि परिश्रम करणे सुद्धा तितकेच जरुरीचे आहे.
कारण आपल्या मनातील पक्का निश्चय आणि आपले योग्य परिश्रम आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपोआपच कार्यप्रवृत्त करते आणि आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मिळते. जर आपल्याला हवी असलेली गोष्ट जर साध्य करायची असेल तर आपली इच्छा तीव्र आणि प्रबळ असेल तर त्याची पूर्तता होतेच होते.

आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम तसा विचार केला पाहिजे आणि तो विचार कायम आपल्या मनामध्ये धरून ठेवायला पाहिजे. सुरवातीला असे करणे जड जाते परंतु जर आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायला सुरवात केली की आपोआपच आपण ते विचार मनामध्ये घट्ट धरून ठेवायला शिकू. सुरवातीला आपल्या मनासारखे काही घडणार नाही, आपल्या कामामध्ये काही अडचणीही येतील, पण हेच सुरवातीचे क्षण आपल्याला काहीतरी सुचवत असतात आणि आपल्या मनाची तयारी करून घेत असतात म्हणून आपण थोडेसुद्धा घाबरले नाही पाहिजे. येथेच अधिकांश लोकं घाबरून प्रयत्न सोडून देतात आणि मी आपला आहे त्या स्थितीतच बरा आहे, असे स्वतःच्या मनाला सांगून मोकळे होतात आणि पुढचे पाऊल टाकतच नाहीत. म्हणूंनच जर आपल्याला खरोखरच जर बदल हवा असेल तर प्रयत्न मधेच सोडू नका आणि कायम आशावादी राहा. कायम आपल्या मनाला सांगा की मी ह्या अडचणी आणि संकटातून सहीसलामत बाहेर आलेलो आहे. तुमच्या मनाचा निर्धार आणि तुम्ही परिश्रम करायला कायम तयार असाल तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आपल्या प्रबळ इच्छांना जर निश्चय आणि योग्य परिश्रमाची जोड दिली तर यश मिळणे पक्के आहे आणि तेच मग पिकल्या फळासारखे तुमच्या पदरात अगदी अलगत पडेल. Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  
https://goo.gl/Wib57Cखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या