सोमवार, ९ एप्रिल, २०१८

तुमची स्वप्ने साकार करा

तुमची स्वप्ने साकार करा 


आपल्या सर्वांनाच माहित आहे आणि इतिहासही साक्षी आहे की ह्या जगामध्ये आतापर्यंत अनेक थोर व्यक्ती होऊन गेलेल्या आहेत. त्यांच्या कार्याचा आजही गौरव होतो इतकी मोठी कार्ये त्यांनी केलेली आहेत.
तुमची स्वप्ने साकार करा
तुमची स्वप्ने साकार करा
पण ह्या सर्व कार्याची प्रथम सुरवात त्यांच्या मनामध्ये सुरू झाली आणि मगच ती प्रत्यक्षात उतरली. त्यांनी त्यांच्या मनामध्ये अनेक स्वप्ने बाळगली होती. ह्या प्रत्येक महान व्यक्तीप्रमाणे आपणही आपल्या क्षमता ओळखून एखादे महान कार्य नक्कीच करू शकतो.
तुम्हाला जे काही बनायचे आहे, घडवायचे आहे अशाच लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करा आणि अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्याशी संगत ठेवा. तुमच्या ध्येयाला जे काही अनुकूल वातावरण आहे अशाच वातावरणात तुम्ही राहा. ह्यात तिळमात्र शंका नाही की तुमचा विकास घडवण्याची संधी तुम्हाला नक्कीच मिळेल. तसे पाहायला गेले तर अशी संधी आपल्याला बऱ्याच वेळा चालून येते, पण काही थोड्याच लोकांना तिचा अंदाज येतो आणि ते पटकन त्या अमूल्य संधीचा फायदा उचलतात.

आपली प्रत्येक कृती ही आपल्या ध्येयाला अनुसुरूनच असावी तरच आपल्या भोवती यशाचे वातावरण तयार होईल. प्रत्येकाने स्वप्ने पाहिली आहेत पण ज्यांनी त्यासाठी योग्य मेहनत घेतली आहे त्यांनाच यशप्राप्ती झालेली आहे. आता मी तुम्हाला एक सोप्पी पद्धत सांगणार आहे, आजपासून रोज रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण मन शांत   करून आपल्याला जे काही ध्येय गाठायचे आहे त्याबद्दल विचार करा, आपण ते ध्येय गाठण्यासाठी जे काही आत्तापर्यंत प्रयत्न केलेले आहेत त्याचा आढावा घ्या. अशा प्रकारे रोज जेंव्हा तुम्ही स्वतःशी संवाद करायला लागलं तेंव्हा आपोआपच तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही नव्या उत्साहाने कमला लागाल. अशा प्रकारच्या नियमित चिंतनामुळे तुमच्या ध्येयाच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीला मदत मिळते आणि तुमची स्वप्ने साकार व्हायला देखील मदत होते.


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...