चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!


आपल्या सर्वांनाच हे माहित आहे आणि किंबहुना अनेकजण हेच सांगतात की, पायी चालल्याचे अनेक फायदे आहेत पण हे अनेकांना माहित असूनदेखील बरेचजण चालणे टाळतात.
चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

चालण्याचे हे फायदे वाचून व्हाल थक्क!

पण आजच्या बिझी लाइफ स्टाइल मध्ये आणि तासंतास बसून काम करण्याच्या पद्धतीमुळे चालणे फारच गरजेचे झाले आहे.
संशोधकांच्या नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, आपल्या क्षमतेप्रमाणे जर आपण वेगात चाललो तर डिप्रेशनपासून मुक्ती मिळते तसेच अतिरिक्त चरबी जी अनेक मानसिक आणि शारीरिक आजार पैदा करू शकते त्यावरही चांगले नियंत्रण मिळवता येते.
तसेच ह्या अभ्यासातून काही हाय ब्लड प्रेशर ग्रस्त लोकांना सहभागी करुन घेतले होते. जे लोकं वेगात चालायचे त्यांची तीन वर्षात रुग्णालयात अॅडमिट होण्याची संख्या कमी झालेली आढळून आली. संशोधकांनी असेही नमूद केले की, चालणे हे प्रत्येकासाठी योग्य असून हा व्यायाम एकही पैसा खर्च न करता आणि कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय केला जाऊ शकतो.

तर आता आपण पाहुयात काय आहेत वेगाने चालण्याचे फायदे -

संशोधकांच्या म्हणण्यानुसार वेगाने चालण्याचे तुम्हाला खालील फायदे होतात.

१) आठवड्यातून 2 तास चालण्याने ब्रेन स्ट्रोक शक्यता बऱ्याच अंशी कमी होते.

२) रोज 30 ते 60 मिनिटे पायी चालण्याने हार्ट अटॅकची, डिप्रेशनची शक्यता तसेच मधुमेहाचा धोका कमी होतो.

३) रोज कमीत कमी 1 तास पायी चालल्याने लठ्ठपणा कमी व्हायला मदत होते.

४) सकाळी लवकर उठून चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो तसेच हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्त्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळते.

५) चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायाम तर होतोच पण सतत काम करून तन-मनाला आलेला थकवाही दूर होतो.

६) चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडपणा दूर होण्यास मदत आणि परिणामी झोपही चांगली लागते.

७)  वजन कमी करायचे असल्यास तसेच मन एकाग्रतेसाठी व चिंतनासाठी चालणे फायदेशीर ठरते.

८) चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते, पचनाचे विकार कमी होतात. तसेच झपझप चालण्यामुळे हृदयाची गती वाढतो.

९) नियमित चालण्याने फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते तसेच ह्रदयविकाराने मृत्यू येण्याचे प्रमाण ५० टक्के पेक्षा कमी असते.

१०) नियमित चालण्यामुळे हाडांची मजबुती वाढते तसेच पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते.

११) नियमित चालण्यामुळे कंबर, मांड्या, पायाचे स्नायू मजबूत कालांतराने मजबूत होत जातात.

१२) नियमित चालण्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि नैराश्याची पातळी खाली येण्याससुद्धा मदत होते.

१३) संशोधकांच्या मते दररोज ३० मिनिटे नियमित चालण्यामुळे सरासरी आयुष्य ३ वर्षांनी वाढते. म्हणूनच  नियमित चालणे ही दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे.

१४) हा व्यायाम कोणत्याही वयात केला जाऊ शकतो. आपल्या उतरत्या वयातही शरीर साथ देत असेल तर चालण्याचा व्यायाम करू शकता, मात्र झेपेल इतकाच!.Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या