यशस्वी होण्यासाठी मुलांना हे जरुर शिकवा.

यशस्वी होण्यासाठी मुलांना हे जरुर शिकवा.

आपल्याला जर खरंच आपली मुले यशस्वी व्हावी असे वाटत असेल तर नुसते फक्त ज्ञान गरजेचे नाही.
Preschool teacher and children using globe. 
तर मुलांना लहानपणापासूनच रचनात्मक आणि व्यवहारीक ज्ञान पालक म्हणून आपण देणेही तितकेच गरजेचे आहे. त्याकरता मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहारीक ज्ञान देणेही आवश्यक आहे.
तसेच हल्लीचा काळ हा खूपच आधुनिक काळ असल्यामुळे ह्या बदलत्या काळात येणाऱ्या परिस्थितीला योग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी काही गुण त्यांच्यात उत्पन्न करणे, त्यांचा विकास करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तर या बदलत्या काळात आपल्या मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी हे काही गुण जरुर शिकवा...

लीडर

आपल्या मुलांना आपण त्यांच्या मोठेपणी योग्य क्षेत्रात प्रगती करण्याचे स्वप्न दाखवले पाहिजे. पण कधीही त्यांना विशिष्ट क्षेत्रच निवडण्याची सक्ती न करता त्यांच्या इच्छेनुसार, आवडीनुसार ते आपापले करिअर क्षेत्र निवडतील असे आपण पाहिले पाहिजे. त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात एक उत्तम लीडर बनवता येईल.

शिकण्याची वृत्ती

आपल्या मुलांना नेहमीच नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी प्रेरीत करत राहा. त्यांना नव्या गोष्टी शिकण्याची संधी देऊन नेहमीच त्यांना पडणाऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठी तत्पर राहा. तर काही प्रश्नांची उत्तरे त्यांची त्यांना शोधायला लावा.

मदत करण्यासाठी प्रोत्साहित करा

हल्लीच्या काळात खूप मुले ही आत्मकेंद्रित झालेली दिसून येतात आणि जास्तीतजास्त वेळ टीव्ही किंवा मोबाइलवर आपला वेळ घालवताना दिसून येतात अशा वेळेस आपण आपल्या मुलांना नेहमीच दुसऱ्यांमध्ये मिसळण्यासाठी तसेच गरज पडल्यास नेहमी दुसऱ्यांची मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. ही सामाजिक भावना त्यांच्या वैयक्तिक विकासासाठीही फायदेशीर ठरेल.

जबाबदारीची जाणीव

लहानपणापासूनच  आपण आपल्या मुलांना योग्य जबाबदारीची जाणीव करुन दिली पाहिजे. त्यासाठी कळतनकळत त्यांच्यावर कोणताही ताण टाकू नये. लहान-सहान गोष्टीतून त्यांना जबाबदारीची जाणीव करुन दिली की त्यांना ती एखादी गोष्ट पटकन समजायला मदत होईल.त्यांनी केलेले काम, केलेला अभ्यास याची जबाबदारी घ्यायला आपण योग्य प्रकारे शिकवले पाहिजे आणि त्यांना वेळोवेळी प्रेरित केले पाहिजे.

मार्गदर्शक बनवा

एक पालक म्हणून आपल्याला असलेली माहिती, ज्ञान शेअर करण्याची सवय मुलांना लावा. योग्य मार्गदर्शन करणे हे चांगल्या लीडरचे लक्षण आहे हे त्यांना पटवून द्या. अभ्यासाचा भरपूर ताण न देता त्यांना जगाशी जोडण्याची संधी द्या. त्यामुळे त्यांना नवनवे अनुभव येतील आणि त्यांच्या ज्ञानात भर पडेल.मुलांना इतर संस्कृती, धर्म याबद्दल आदरभाव निर्माण करणारे गुण विकसित करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शिबिरांमध्ये किंवा कार्यशाळांमध्ये सहभागी करा. त्यामुळे मुलांना ह्यातून खूप काही शिकता येईल आणि मोठेपणी तेही येणाऱ्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शक बनतील.


Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या