हे पदार्थ खाऊन उन्हाळ्यात वजन घटवा

हे पदार्थ खाऊन उन्हाळ्यात  वजन घटवा

उन्हाळ्यात शरीरामध्ये जर पाण्याचे प्रमाण कमी झाले तर अनेकांना उष्णतेचा प्रचंड त्रास होतो. काही लोकांना तर अति उष्णतेमुळे फारसे जेवणही जात नाही.
हे पदार्थ खाऊन उन्हाळ्यात  वजन घटवा

हे पदार्थ खाऊन उन्हाळ्यात  वजन घटवा

पण एवढं सगळं असूनही वजन काही केल्या कमी होत नाही. अशा परिस्थितीत फिटनेसच्या बाबतीत कायम सतर्क असणारे लोक आपल्या खाण्यापिण्यावर जास्त लक्ष्य देऊन आपल्या वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.


परंतु जर डाएट प्लॅन फॉलो करताना जर काही गोष्टी पाळल्या गेल्या नाहीत तर वजन हव्या त्या प्रमाणात कमी होत नाही आणि मग निराशा पदरी पडते.

पण जर ह्या वाढत्या उन्हाळ्यात काही पदार्थ जाणीवपूर्वक आपल्या आहारात वापरले तर, वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवणे आपल्याला सहजच शक्य होईल आणि आपले शरीरही चांगल्या प्रकारे तंदुरुस्त राहण्यास  मदत होईल.

टरबूज
ह्यामध्ये नैसर्गिकत्याच भरपूर पाणी आणि विशेष करून चवदारपणा असतो. उन्हाळ्यात ह्या फळाचे जितके जास्त सेवन केले जाईल तेवढे आपल्या शरीरासाठी चांगले राहील आणि आपल्या शरीराचे तापमानही आटोक्यात राहून ते हाइड्रेटेड राहण्यास मदत होईल.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीचे असंख्य उपयोग आहेत आणि ते खाण्यासाठीही खूपच उपयुक्त असते. ह्यामध्ये असलेल्या काही औषधी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात त्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो.

काकडी
वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असलेल्या ह्या फळाला अशी विशेष काही चव नसते, परंतु सलाड म्हणून हे फळ बऱ्याच लोकांचे फेव्हरेट आहे. काकडीमध्ये नैसर्गिकरीत्याच भरपूर पाणी असल्याने असंख्य ठिकाणी उन्हाळ्यात आपल्याला काकडी विकणारे दिसून येतात आणि उन्हाळ्यात हा एक सर्वोत्तम पर्याय आहे, काकडीचा रायता सुद्धा खूपच सुंदर बनतो. काकडीत असलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रमाणामुळे  शरीरातील डायजेस्टीव सिस्टमला ते खूपच फायदेशीर ठरते. काकडी आपण कोणत्याही वेळेस खाऊ शकतो, त्यासाठी काही विशेष वेळ पाळण्याची तरी काही गरज पडत नाही.

टोमॅटो
सॅलडमध्ये, सॅन्डविचमध्ये टोमॅटोला विशेष असे महत्व आहे, तसेच ह्याचे अनेक फायदे देखील आहेत. ह्यातसुद्धा पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने आपल्या शरीरातील पाण्याची कमी पूर्ण करण्यास हे फळभाजीतले छोटेसे टोमॅटो खूपच फायदेशीर ठरते. 


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या