ह्या कारणांमुळे वाढते कंबरेजवळील चरबी !

ह्या कारणांमुळे वाढते कंबरेजवळील चरबी !

( Reasons of increasing fats in body )



कामाच्या गडबडीत तुमच्या कंबरेजवळील भाग अधिक सुटू लागल्याचे तुम्हाला जाणवतेय का?
ह्या कारणांमुळे वाढते कंबरेजवळील चरबी !

ह्या कारणांमुळे वाढते कंबरेजवळील चरबी !

कारण आजकाल ९ ते १० तास ऑफिसमध्ये बसून काम करण्याच्या जीवनशैलीमुळे ही समस्या बऱ्याच लोकांमध्ये आढळून येत आहे आणि त्यामुळे हे सर्वच जण त्रस्त आहेत.
यासाठी फक्त जंक फूड कारणीभूत नसून इतरही अनेक गोष्टी जबाबदार आहेत. ह्यात सर्वात प्रमुख म्हणजे आजची आपली गुंतागुतीची आणि धावपळीची जीवनशैली जास्त जबाबदार ठरताना दिसून येत आहे.

पुरेशी झोप न घेणे:

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांची झोप पूर्ण होत नाही आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम कालांतराने कंबरेजवळील चरबी सुटण्यावर होतो. त्यामुळे शरीरातील पचनसंस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होऊन इतरही शारीरिक आणि मानसिक समस्यांना आमंत्रण मिळते.

दिवसभर बसून काम असल्यास:

दिवसभर बसून काम केल्याने वजन वाढू लागते आणि पर्यायाने शरीराच्या खालच्या भागाचे वजन वाढायला लागते.  तुमचे काम बैठ्या स्वरूपाचे असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घ्या आणि थोडे चालण्याची सवय ठेवा. तसेच शक्य तेवढे पाणी प्या.

अयोग्य जेवण:

मटण, दुग्धजन्य पदार्थ यांसारख्या सॅच्युरेटेड फॅट्सच्या अति सेवनाने visceral fat वाढीस लागते आणि कंबरेजवळील भागात चरबी वाढायला लागते.

तणावग्रस्त असल्यास:

जर तुम्ही तणावग्रस्त वातावरणात काम किंवा वावरत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या रोजच्या जीवनशैलीमध्ये होऊन उच्च रक्तदाबासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच वर म्हटल्याप्रमाणे झोप कमी होऊन वजन वाढू शकते तसेच खाण्यापिण्यावरही ह्याचा थेट परिणाम होऊ शकतो.

रात्री उशिरा जेवण्याची सवय:

बरेच जण हल्लीच्या काळात रात्री कामावरून उशिरा येतात, पण जर तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर झोपेत फॅट्सचे ऊर्जेत रूपांतर करणे शरीराला कठीण जाते कारण रात्री जेवल्यानंतर आपल्या शरीराची हालचाल कमी असते आणि परिणामी चरबी वाढते. तसंच अपचन, अॅसिडिटी सारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागते.


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या