मंगळवार, १७ एप्रिल, २०१८

आपले दैवी सामर्थ्य ओळखायला शिका

आपले दैवी सामर्थ्य ओळखायला शिका 

कोणतेही योग्य कार्य करताना परमेश्वर माझी इच्छा पूर्ण करेलच असा विश्वास आपण कायम बाळगला पाहिजे. त्यातूनच आपण करत असलेली प्रार्थना सफल होईल.
आपले दैवी सामर्थ्य ओळखायला शिका
आपले दैवी सामर्थ्य ओळखायला शिका 
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेंव्हा आपण परमेश्वराची प्रार्थना करू तेंव्हा आपला आपल्या परमेश्वरावर कायम विश्वास असला पाहिजे, कारण ईश्वराचे भांडार हे कधीही न संपणारे आहे.
आपण सर्व ह्या परमेश्वराचीच रूपे आहोत आणि ह्या परमेश्वरानेच आपल्याला निर्माण केलेले आहे. तो नेहमीच आपल्याला मदत करायला तयार आहे.

त्याचे भांडार सगळ्या भक्तांना पुरून उरेल इतके आहे आणि कधीही न संपणारे आहे. जर आपण रोजच्या रोज आपल्या परमेश्वराशी संबंध जोडला तर तो आपल्याला रोजच जाणवेल. ज्याप्रमाणे निसर्गात सुर्य, प्रकाश न मागता देतो, झाडे सावली देतात तसेच आपला परमेश्वरसुद्धा आपल्या भक्तांवर मनापासून कृपा करत असतो. जसे एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला जातो तेंव्हा पहिल्या दिव्याचा प्रकाश हा कधीच कमी होत नसतो तो नेहमी तितकाच राहतो. माणसाची मैत्री आणि प्रेमभावना पण अशीच आहे, जर आपण मनापासून दुसऱ्या व्यक्तीला मैत्री आणि प्रेम दिले तर ते कमी न होता दिवसेंदिवस वाढतच जाणारे आहे.

तसेच आपला परमेश्वरसुद्धा त्यांच्या भक्तांबरोबर असेच करतो म्हणूनच त्याची कीर्ती सातासमुद्रापार पसरते. आपण सुद्धा परमेश्वराचेच अंश असल्याने आपल्यातही ते दैवी सामर्थ्य आहे, फक्त ते दुसऱ्यांना आपण योग्य पद्धतीने मैत्री आणि प्रेमाच्या रूपात कायम वाटले पाहिजे जेणेकरून आपली कीर्तीसुद्धा सर्वठिकाणी पोहोचेल.Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...