सोमवार, १६ एप्रिल, २०१८

आहारात दुधीचा समावेश करा!

या फायद्यांसाठी आहारात दुधीचा समावेश करा!


उन्हाळ्यात शरीराला पाण्याची अधिक गरज असते. जसजसा उन्हाळा वाढतो शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
आहारात दुधीचा समावेश करा!
आहारात दुधीचा समावेश करा!
पण असे काही पदार्थ आहेत ज्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर तुम्हाला फ्रेशही वाटते. त्यापैकी एक पदार्थ म्हणजे दुधी. अनेकांना दुधी आवडत नाही. पण त्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया काय आहेत ते...

फ्रेशनेससाठी

दुधीचा रस घेतल्याने शरीरात टवटवीतपणा टिकून राहतो. शरीर हलके वाटते आणि तुम्ही फ्रेश राहता. फ्रेश ठेवण्यासाठी रोज सकाळी दुधीच्या रसात मीठ आणि जिरे घालून प्या.

पोटांच्या विकारावर उपयोगी 

रोज सकाळी रिकाम्या पोटी दुधीचा रस घेतल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. त्याचबरोबर पोटातील जळजळ कमी होते. हा रस नियमित घेतल्यास पोटासंबंधित सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी

वजन नियंत्रित राहण्यासाठी दुधीचा रस फायदेशीर ठरतो. दुधीचा रस प्यायल्याने लवकर भूक लागत नाही त्यामुळे अतिरिक्त खाण्यावर आळा बसतो. शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. परिणामी वजन नियंत्रित होण्यास मदत होते.

टायफाईड

दुधीमुळे टायफाईडपासून सुटका मिळते. यासाठी दुधी कापून पायांच्या तळव्यावर घासा. त्यामुळे टायफाईडमध्ये येणाऱ्या तापामुळे होणारी जळजळ कमी होते आणि आराम मिळतो.

गर्भावस्थेसाठी लाभदायक

दुधीचा रस गर्भावस्थेसाठी लाभदायक ठरतो. गर्भावस्थेत होणारे विकार दूर होतात. ज्या स्त्रियांना वेळोवेळी गर्भपात किंवा गर्भस्त्राव होण्याची समस्या असते त्यांनी दुधीचा रस जरुर प्यावा. दुधीच्या रसाने गर्भाशय मजबूत होते आणि गर्भस्त्रावाची समस्याही दूर होते.


प्रतिमेचे आणि लेखाचे सौजन्य : https://bit.ly/2ICDS9v


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...