शनिवार, १४ एप्रिल, २०१८

नेहमी उच्च ध्येय ठेवा

नेहमी उच्च ध्येय ठेवा

ह्या जगात प्रत्येक माणसामध्ये महान कार्य करण्याची क्षमता आहे आणि आपण महान कार्य करण्यासाठीच जन्म घेतला आहे असा कायम विश्वास ठेवा. 
नेहमी उच्च ध्येय ठेवा

नेहमी उच्च ध्येय ठेवा

तुम्ही ह्या जगात एक समृद्ध जीवन जगण्यासाठीच जन्म घेतला आहे आणि इतिहासात अशी अनेक माणसे होऊन गेली आहेत, त्या माणसांनी आपण ह्या जगात महान कार्यासाठीच जन्म घेतला आहे ह्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्याकडून  महान कार्ये होत गेली.
इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते की, तुमच्यामधील दैवी शक्तीचा जेंव्हा तुम्हाला पडताळा होईल तेंव्हा तुम्हाला समजेल की तुम्हीसुद्धा एक समृद्ध जीवन जगण्यासाठीच जन्म घेतला आहे.


आपल्या मनामध्ये कोणत्या इच्छा उत्पन्न होतात? त्या पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुमच्यात आहे हे कधीही विसरू नका. त्यासाठी योग्य प्रयत्न आणि श्रम हे तर ओघाने आलेच पण कधीही आपले ध्येय किरकोळ ठेवू नका, ते नेहमीच उच्च ठेवा. ध्येय हे नेहमीच महान असले पाहिजे. जेंव्हा ते महान असेल तेंव्हाच तुम्ही तुमच्या अंतरंगातील दैवी शक्तीचा पुरेपूर उपयोग कराल. किरकोळ ध्येय तर सहजच पार केली जातात पण जर ध्येय जर किरकोळ असेल तर आयुष्यात आपण काहीच भव्यदिव्य करू शकणार नाही. कारण किरकोळ ध्येयामुळे आपले कार्यक्षेत्र आपोआपच मर्यादित होऊन जाते आणि आत्मविश्वासाला देखील उच्च पातळी गाठता येत नाही, आणि आपली लायकी असूनसुद्धा आपण उच्च ध्येय गाठण्यात अयशस्वी होऊ शकतो आणि आपल्या मग प्रगतीला आपोआपच मर्यादा येतात. म्हणूनच नेहमी आपले ध्येय उच्च असले पाहिजे.

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:  

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight

वजन कमी करण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर उपाय | Easiest and most effective way to lose weight हल्लीच्या धावपळीच्या काळात वजन कमी करण्य...