धडपडीचा काळ आपल्याला घडवतो

धडपडीचा काळ आपल्याला घडवतो 

ह्या जगात सर्वात श्रेष्ठ प्राणी कोण असेल तर तो मनुष्य प्राणी आहे. इतर प्राणी स्वतःची परिस्थिती बदलू शकत नाहीत पण मनुष्य ती आपल्या उच्च विचारांनी सहज बदलू शकतो.
धडपडीचा काळ आपल्याला घडवतो

धडपडीचा काळ आपल्याला घडवतो 

आपली परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य परमेश्वराने आपल्याला जन्मताच दिलेले आहे. आपण कायम स्वतंत्र असावे आणि आपले आयुष्य कायम आनंदाने घालवावे असे प्रत्येक माणसाला मनोमन वाटत असते. प्रत्येक माणसाला त्याची भरभराट व्हावी असेच वाटत असते.
आपल्या स्वउत्कर्षासाठी तो मेहनतही करत असतो आणि त्यात त्याला आनंदही वाटत असतो. एखाद्या यशस्वी व्यक्तीला जर आपण विचारले की तुमच्या आयुष्यातील महत्वाचा काळ कोणता? तर अशा व्यक्तीच्या तोंडून सहजच निघेल की ज्या काळात मी माझ्या उत्कर्षासाठी झटत होतो, परिश्रम घेत होतो तो काळ माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा काळ होता.

खरंच ते दिवस मी कधीच विसरू शकत नाही. आज जे काही माझ्याकडे वैभव आहे ते सर्व काही माझ्या धडपडीचा काळात मी मन शांत ठेवून केलेल्या योग्य मेहनतीमुळेच आहे. त्यावेळेस माझ्या मार्गात अनेक संकटे होती, अडथळे होते आणि त्यांचा सामना करताना मला काहीच त्रास जाणवत न्हवता कारण माझे ध्येय निश्चित होते, मी माझे मन माझ्या ध्येयापासून कधीच ढळू दिले नाही. तेंव्हा सतत नवीन आव्हाने समोर येत असायची आणि त्यांचा मी धीराने माझ्या धड्पधीच्या काळात सामना केला म्हणूनच आज मी हे समृद्ध जीवन अनुभवत आहे. कधी कधी ह्या काळात नैराश्य सुद्धा यायचे पण मनामध्ये पक्का निर्णय असल्यामुळे मी त्यातून सहज बाहेर आलो आणि माझी संकटे आणि आव्हानेसुद्धा क्षणिक वाटली. एक गोष्ट कायम लक्षात घ्या की आत्मविश्वासातूनच माणसाच्या कार्याची क्षितिजे विस्तारली जातात आणि तो या जगात काही महान कार्य करू शकतो कारण आव्हाने आपल्याला नेहमीच आपली क्षमता दाखवण्याची संधी प्राप्त करून देतात म्हणूनच धडपडीचा काळ हा प्रत्येक मनुष्याला घडवीत असतो.


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या