ईश्वरी प्रार्थनेमधील सामर्थ्य:

ईश्वरी प्रार्थनेमधील सामर्थ्य:

तुम्ही तुमच्या ध्येयासाठी कोणतेही प्रयत्न करत असाल आणि त्या प्रयत्नांबरोबर जर तुम्ही त्याला प्रार्थनेची जोड दिलीत तर तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतात.
ईश्वरी प्रार्थनेमधील सामर्थ्य:
ईश्वरी प्रार्थनेमधील सामर्थ्य:
 फक्त जरूर आहे ती परमेश्वराची प्रार्थना ही शुद्ध भावनेतून केलेली असावी. आपल्या प्रत्येकामध्ये परमेश्वरी अंश आहे, आणि हा परमेश्वरी अंश आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतो.
यालाच आपण आत्मशक्ती असेही म्हणू शकतो. परमेश्वर नेहमीच आपले सामर्थ्य जागे करून आपल्याला मदत करत असतो.
तो आपल्यासमोर अशी काही परिस्थिती निर्माण करतो की आपल्या ध्येयाच्या प्रवासात भेटणारी माणसे, कुठल्याही प्रकारची मदत किंवा एखादी वस्तू अशा स्वरूपात ती आपल्या समोर येत रहाते. ही मदत आपल्या मनाच्या खंबीरपणामुळे आणि वाढत्या सामर्थ्यामुळेच आपल्याला जाणवत रहाते. 

आपल्याला हे तर ठाऊकच आहे की प्रत्येक झाड हे योग्य हंगामातच फळे आणि फुले देते. येथे समजा फळ मिळाले नाही तर कुठेतरी चूक झाली आहे असे निश्चित समजावे. जो नियम वृक्षांना लागू पडतो तोच नियम आपल्या सारख्या माणसांवरही लागू होतो कारण हा निसर्ग नियम आहे आणि निसर्ग कोणामध्येही भेदभाव करत नाही. काही लोकांना पूर्ण आयुष्यभर सुखसमृद्धी लाभते तर काहींच्या वाट्याला कायमच दु:ख येत असते. पण दु:ख येणे हा आपल्या विचारांचाच परिणाम असतो हे बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणूनच मनामध्ये कायम आशावादी विचार व ईश्वरनिष्ठा बाळगावी लागते. 

ह्या जगात प्रयेक माणसाकडे काहीनाकाही गुण आणि कला आहे. प्रत्येक माणसामध्ये आदर्श व्यक्ती बनण्याची क्षमता असते पण सर्वच माणसे आदर्श जीवन जगत नाहीत कारण त्यांना त्यांचे गुण ओळखता येत नाहीत आणि त्यांच्या मनामध्ये आशावादी विचारांचा अभाव असतो. तुमचे आयुष्य हे आदर्श असावे ही कायमच ईश्वराची इच्छा असते आणि तसे सामर्थ्यही ईश्वराने प्रत्येकाच्या अंतरंगात निर्माण केलेलं आहे. म्हणून परमेश्वर माझे कायम भलेच करणार ह्यावर कायम विश्वास ठेवा आणि तुमचे प्रयत्न चालूच ठेवा, त्याच्या प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे हे कधीही विसरू नका.Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या