रविवार, १ एप्रिल, २०१८

कायम योग्य विचार करा

कायम योग्य विचार करा


माणसाने सतत आशावादी असले पाहिजे, कारण आशावादी विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते.

कायम योग्य विचार करा

कायम योग्य विचार करा

तुम्ही नेहमीच माझे शुभ आणि चांगलेच होणार आहे ह्याचा विचार मनात आणा. कारण शुभ विचारांचे फळ हे तुम्हाला शुभच मिळणार आहे. इतिहास साक्षी आहे, ज्यांनी शुभ विचार मनात आणले आणि तशी कृती केली त्यांची चांगली प्रगती झाली. एक गोष्ट मात्र नक्की की, नेहमीच आशावादी विचार मनात असतील तर आपले सामर्थ्य देखील आपोआपच वाढते आणि काम करण्यात देखील उत्साह येतो. ह्याचा कदाचित आपण बहुतेक वेळा अनुभव हा कधीनाकधी घेतलाच असेल. आशावादी विचार मनात येण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील पण नंतर त्याची सवयच होऊन जाईल. प्रगतीच्या मार्गावर आपले पाऊल नेहमीच पुढे पडून आपल्याला हवे ते आपण सहज साध्य करू शकू.


आपण आपल्या मनात बाहेरील वातावरण कसेही असले तरी चांगल्या विचारांनाच प्रवेश दिला पाहिजे आणि हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. इथे कोणीही आपल्या इच्छेशिवाय आपल्या मनात प्रवेश करू शकत नाही. कारण उच्च विचारच आपले हित करतात, एखादा नकारात्मक विचार आपला संपूर्ण दिवस किंवा आठवड्याचे काम सुद्धा बाधित करू शकतो किंवा कित्येक दिवस आपण त्या पासून आपले लक्ष्य हटवू शकत नाही. अशा वेळेस आपण त्या विचारांना वेळीच थांबवून सकारात्मक विचार करायला सुरवात केली पाहिजे. ज्या गोष्टींमुळे किंवा विचारांमुळे आपल्याला दुखः होईल, मनात निराशा दाटेल, अपयश येईल अशा गोष्टींपासून लांबच राहावे अथवा त्यांना आपल्याजवळ येऊच देऊ नये. नकारात्मक विचारांना, शंकांना मनात थारा न देता चांगल्या गोष्टींकडे मन रमवले पाहिजे. ह्यातच आपली प्रगती आहे.Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

1 टिप्पणी:

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season

पावसाळ्यात घरच्या घरी करा व्यायाम | Exercise at the home in the rainy season व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे ...