कोणत्याही गोष्टीचा जन्म आधी कल्पनेत होतो:

कोणत्याही गोष्टीचा जन्म आधी कल्पनेत होतो: 


जगात आपण ज्या काही महान गोष्टी पाहत आहोत त्या अस्तित्वात येण्याअगोदर त्या बनवणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये तयार झाल्या, त्यांच्या कल्पनेत तयार झाल्या आणि मग त्या प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या.
कोणत्याही गोष्टीचा जन्म आधी कल्पनेत होतो:
कोणत्याही गोष्टीचा जन्म आधी कल्पनेत होतो: 
कोणताही कलाकार किंवा वास्तुविशारद कोणतीही वस्तू बनवतो तेंव्हा त्या वस्तूची सर्वात पहिली रूपरेखा त्याच्या मनामध्ये तयार होते आणि मग ते त्याच्या कृतीतून आपल्याला समोर नजरेस पडते.
थोडक्यात काय तर जगातील कोणतीही व्यक्ती त्याचे कोणतेही काम सर्वप्रथम मनामध्ये सुरू करते आणि मगच ते काम प्रत्यक्षात त्याचा हातून घडते. म्हणून कल्पना आधी मनात जन्म घेतात व नंतर आपल्या कृतीतून साकार होतात. म्हणूनच कोणत्याही निर्मितीचा विचार हा खूपच महत्वाचा आहे, कारण वर म्हटल्याप्रमाणे ती अगोदर मनामध्येच तयार होणार आहे. 

तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही बनायचे आहे त्याचा योजनाबद्ध नकाशा सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये तयार झाला पाहिजे. आपले जीवन आपल्याला कसे हवे आहे, कसे घडवायचे आहे याचा स्पष्ट नकाशा मनामध्ये प्रथम तयार करा. हीच आहे तुमच्या येणाऱ्या भविष्यकाळाची विशाल इमारत जी तुमच्या मनात तयार होत आहे आणि त्याची सुरवात मनामध्ये योग्य रीतीने व्हायला पाहिजे. एकदा का ती इमारत मनामध्ये तयार झाली की ती कल्पनारूपी इमारत प्रत्यक्षात साकार व्हायला आपण तयार होतो, आणि ह्या कल्पनेला प्रत्यक्षात साकार करायला लागणारे प्रयत्न आपोपच आपल्याकडून घडून येतील.

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या