तुमचं वजन वाढतच चाललंय?

तुमचं वजन वाढतच चाललंय?


आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना त्यांचे काम आणि आरोग्य सांभाळण्यासाठी मेहनत घ्यावी लागत आहे, पण ह्यामध्ये बरेच जण स्वतःच्या आरोग्यापेक्षा दिवसभराच्या कामाला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहेत. त्यातच तास-दोन तास कमी झोपलं तर त्यानं एवढं काय बिघडतं? असे मानणारे बरेच लोक आहेत. तसेच अनेक जण तर अभिमानानं सांगतात, मी रात्री बारा-एकशिवाय कधीच झोपत नाही. सकाळीही लवकर उठतो. जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर झोप कमी घेतली पाहिजे आणि जास्त काम केले पाहिजे. काही करून दाखवायचं असेल, तर झोपेत आयुष्य घालवून काय उपयोग? असं त्यांना वाटत असते. पण तज्ज्ञांचे असे म्हणणं आहे, झोपेचा आणि तुमच्या आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. पुरेशी झोप तुम्ही घेतली नाहीत, तर अंतिमत: तुमचं आयुष्यच कमी होईल. झोपेचा आणि लठ्ठपणाचा, वजनवाढीचाही खूप जवळचा संबंध आहे.

 

कमी झोपेमुळे आपल्या शरीराच्या हार्मोन्समध्ये अयोग्य बदल होतात आणि ह्यामध्ये आपली भूक ही मुख्यत: जास्त अवलंबून असते आणि आपले योग्य किंवा अयोग्य खाणे आपल्या वजनावर कशा प्रकारे परिणाम करू शकते हे तर आपल्याला माहीतच आहे. जर झोप कमी झाली तर आपल्या खाण्यावर त्याचा थेट परिणाम होऊन आपल्या नकळत दिवसभरात जास्त अन्न खाल्ले जाते.

ज्या व्यक्ती कमी किंवा अगदी पाच तासांपेक्षाही कमी झोपतात, त्यांच्या शरीरातील हार्मोन्स इम्बॅलन्स होतात त्यामुळे दिवसभरात कितीही खाल्ले तरी त्यांच्या मनाचे समाधान होत नाही आणि जास्त खाल्ल्यामुळे ज्या अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात, त्याचं चरबीत रुपांतर होतं आणि वजन हळूहळू किलो किलोनं वाढत जातं. त्यामुळे काही महिन्यांनी आपल्या लक्षात येते की आपले वजन वाढले आहे. पण जर त्यांचे मूळ कारण आपण शोधले तर आपल्या लक्षात येईल की निसर्गाचे काही सोप्पे नियम आहेत जसे की रोज ६ ते ८ तास झोपले पाहिजे, रोज सकाळी न चुकता ब्रेक फास्ट हा केलाच पाहिजे, रोज ८ ते १० ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे, रात्रीचे जेवण लवकर आणि कमी घेतले पाहिजे.


हे साधे आणि सोप्पे नियम मोडले की आपले शरीरसुद्धा कालांतराने आपल्याला धोक्याचे सिग्नल देण्यास सुरवात करते. पण आपल्याला वाटते की मी तर सर्व गोष्टी नीट पळत आहे. पण जेव्हा हे  कळतं तेंव्हा फार उशीर झालेला असतो आणि त्यासाठीचे कष्टही मग खूप घ्यावे लागतात. तज्ज्ञांच्या सर्वेक्षणानुसार आज जगातील ७०% लोक हे चुकीच्या जीवन पद्धतीमुळे आजारी पडत आहेत त्यावरूनच लक्षात येते की निसर्ग नियम किती काटेकोरपणे पाळले पाहिजेत.

Regards

तुमचं वजन वाढतच चाललंय?

तुमचं वजन वाढतच चाललंय?

 

(Image From) https://goo.gl/pqc3Ay

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या