भोजनाची योग्य पद्धत

भोजनाची योग्य पद्धत  


आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये बरेच जणांचे भोजनाचे वेळापत्रक काहीसे बिघडलेले दिसून येते अशातच भोजनानंतर लगेच काही लिखाण, वाचन, संगणक काम, किंवा इतर शारीरिक कष्ट केल्याने पचनक्रिया करणाऱ्या अवयवांना रक्त पुरवठा कमी होतो व काम करणाऱ्या बाह्य अवयवांना जास्त प्रमाणात रक्त संचार केला जातो जे अन्न पचनास घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भोजनानंतर कमीत कमी अर्धा तास शारीरिक किंवा बौद्धिक काम करू नये ही बदलत्या जीवनशैलीची एक अत्यावश्याक गरज आहे. भोजन वेळेवर करणे आणि त्यानंतर काही नियम पाळणे ही एक शरीराची प्राथमिक गरज आहे. अशातच आपण नेहमीच सर्व ताण तणाव, क्रोध, ईर्ष्या विसरून भोजन केले पाहिजे.
  भोजन करताना शारीरिक शांतता, मानसिक प्रसन्नता, एकाग्रता ठेऊन भोजन केले पाहिजे. विशेष करून जेवण करताना मोबाइल किंवा टीव्ही पाहू नये. भोजन करताना चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव असण्यापेक्षा एक स्मित आनंद असावा. नियमितपणे ठरलेल्या वेळीच भोजन करावे, म्हणजे ठरलेल्या वेळीच भूक लागते व पचनक्रिया देखील सुरळीत घडते.

शक्यतो नेहमीच ताजे अन्न खावे. सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये बरेचजण टी.व्ही किंवा मोबाईल मध्ये बघत भोजन करतात परंतु टी.व्ही. , मोबाईल पाहत भोजन करण्याची सवय गंभीर आजारासाठी कारणीभूत ठरू शकते, हे जाणून घेण्याची आज काळाची गरज आहे. ह्याचे नेमके कारण आपण आता समजून घेऊया जर टी.व्ही किंवा मोबाईल पाहताना भोजन केले जाते तेंव्हा ७०% पेक्षा जास्त लक्ष टी.व्ही. किंवा मोबाईल कडे असते, आणि तोंडात जाणारा घास हा बत्तीस वेळा चावण्याऐवजी खूपच कमी चावला जातो आणि नकळत कमी चावून गीळला देखील जातो. त्यामुळे प्रत्तेक घासामध्ये जठरास आवश्यक तेवढी लाळ मिसळली जात नाही व आतडयांवर अधिक ताण पडून दुर्बलता येते. अन्न जितक्या जास्त प्रमाणात चावले जाईल तितक्याच जास्त प्रमाणात ते जठरास घुसळण्यासाठी सहज असेल. शांतपणे तसेच मन प्रसन्न ठेऊन केलेल्या भोजनानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नये, जेवणानंतर एक तासाने पाणी प्यावे.

बऱ्याच लोकांना जेवणानंतर लगेच थंड आईसक्रिम, कोल्ड्रिंक्सा, चहा, कॉफी घेण्याची सवय असते त्यामुळे पचनास अवश्यचक असणाऱ्या क्रिया मंदावतात आणि कालांतराने त्याचा अयोग्य परिणाम शरीरावर होतो. संध्याकाळी नेहमी सातच्या पूर्वी हलके भोजन करावे जे पचनास जड जाणार नाही. रात्री जास्त जेवण केल्यामुळे सकाळी लोक भरपूर जेवण्याऐवजी थोडासा नाष्टा करतात परंतु सकाळी भरपेट अन्न खाणे योग्य आहे. रात्रीचे जेवण हे नेहमीच कमी असले पाहिजे कारण जेवण केल्यानंतर आपल्या शरीराची सकाळपर्यंत खूपच कमी हालचाल होते.
जेवण झाल्यावर लगेचच काही काम करू नये कारण जेवणानंतर हृदय पचनक्रियेस लागणाऱ्या अवयवांना जास्त प्रमाणात रक्त पुरवठा करीत असते. जर तुम्ही भोजनानंतर लगेच काही लिखाण, वाचन, संगणक काम, किंवा इतर शारीरिक कष्ट करीत असाल तर पचनक्रिया करणाऱ्या अवयवांना रक्त पुरवठा कमी होतो व काम करणाऱ्या बाह्य अवयवांना जास्त प्रमाणात रक्त संचार केला जातो जे अन्न पचनास अयोग्य ठरू शकते. म्हणून भोजनानंतर कमीत कमी अर्धा तास शारीरिक किंवा बौद्धिक काम करू नये. बऱ्याच लोकांना जेवणानंतर झोपण्याची सवय असते पण जेवणानंतर लगेच झोपु नये. रात्री जेवल्यानंतर कमीत कमी २ तास तरी झोपू नये, म्हणूनच संध्याकाळचे जेवण हे नेहमीच कमी प्रमाणांत असावे. 

Regards

भोजनाची योग्य पद्धत

भोजनाची योग्य पद्धत  

 

(Image From) https://goo.gl/GjjJVd

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या