सकाळी लवकर उठण्यासाठी काही टिप्स

या टीप्सने सकाळी लवकर उठण्याचा संकल्प होईल पूर्ण


आपण हे नेहमीच ऐकत आलो आहोत की जर आपल्याला चांगले आरोग्य हवे असेल तर रोज लवकर झोपले पाहिजे आणि सकाळी लवकर उठले पाहिजे. मात्र हल्लीच्या धावपळीमध्ये बरेच जण सकाळी सुर्योद्यापूर्वी उठणे हे जवळजवळ विसरुनच गेले आहेत. सकाळी लवकर उठल्याने दिवसभरातील कामे वेळेत होतात व कामाचा ताण कमी होतो.कामे घाईघाईत करण्याचे किंवा टाळण्याचे प्रमाण कमी होते. सहाजिकच आपला संपुर्ण दिवस फ्रेश जातो.

सकाळी लवकर जाग येण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स-

रात्री वेळेवर झोपा-

हल्ली मोबाइल आणि टेलिव्हिजनच्या जमान्यामध्ये लोकं झोपेला कमी महत्त्व देत आहेत. यासाठी रात्री ठरवून वेळेवर झोपा व सकाळी लवकर उठा. झोपण्यापूर्वी तुम्हाला सकाळी किती वाजता उठायचे आहे ते मनातल्यामनात १० वेळा तरी बोला, उदाहरणार्थ: मी सकाळी ६ वाजता ऊठलेलो आहे.

उशीरा झोपण्याची सवय बदला-

रात्री उशीरा झोपल्याने दुस-या दिवशी सकाळी लवकर उठायला त्रास होऊ शकतो परिणामी सर्वप्रथम ही सवय बदलली पाहिजे आणि रात्री जाणीवपूर्वक लवकर झोपी गेले पाहिजे.

प्रयत्न सोडू नका-

जर आपल्याला ठरवल्याप्रमाणे सकाळी जाग आली नाही तर लगेच धीर सोडू नका. कारण नेहमी आपण कोणत्याही गोष्टी जेंव्हा बदलायला जातो तेंव्हा त्याची सवय होण्यास थोडा तरी कालावधी हा लागतोच म्हणूनच कोणतीही सवय मोडायला थोडा वेळ लागेल हे आधी लक्षात घेतले पाहिजे. जरी पहिल्या दिवशी तुम्हाला वेळेत जाग आली नाही तरी आठवडाभर प्रयत्न केल्यास तुम्हाला लवकर उठण्याची सवय लागेल.

 

आधी छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा-

सकाळी लवकर उठण्यासाठी सर्वप्रथम छोटे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करा म्हणजे पहिल्या दिवशी नेहमीच्या वेळेच्या १५ मिनीटे आधी झोपा व दुस-या दिवशी १५ मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ह्याची सवय झाल्यावर तुमचा वेळ वाढवा आणि ३० मिनीटे आधी झोपा व ३० मिनीटे लवकर उठण्याचा प्रयत्न करा. अशा रितीने तुम्ही तुमच्या ठरलेल्या वेळी सकाळी लवकर उठण्यात यश मिळवू शकाल.
दुपारी झोप घेण्याचे टाळा-

दुपारी झोपल्याने रात्री लवकर झोप लागत नाही व त्यामुळे पुन्हा सकाळी लवकर जाग येत नाही अशाप्रकारचा अनुभव कित्येकांनी घेतला असेलच म्हणूनच दुपारची झोप टाळण्यासाठी स्वत:ला इतर गोष्टी किंवा तुमच्या आवडीच्या छंदामध्ये मध्ये गुंतवा.

झोपण्यापूर्वी वातावरण निर्मिती करा-

आजकाल बरेच जण झोपण्यापूर्वी मोबाइल किंवा टीव्ही पाहतात पण तुम्ही पुस्तके वाचा किंवा संगीत ऐका ज्यामुळे तुम्हाला शांतता मिळेल आणि असे केल्यावर तुमच्या शरीराला झोपण्यासाठी योग्य वातावरण तयार होऊन चांगल्या विचारांनी तुम्ही झोपी जाल. झोप येण्यासाठी तुमच्या रुममधील वातावरण स्वच्छ, नीटनेटके, आनंदी व झोपेसाठी पुरक असे ठेवा.

आठवडाभराच्या कामाचे नियोजन करा-

जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीचे आधीपासून प्लँनिंग करतो तेंव्हा आपल्याला ती गोष्ट करताना कोणतीही अडचण येत नाही तसेच जर तुम्ही आठवडाभरात जी कामे करणार आहात त्याचे आधीच नियोजन करा. रोजच्या कामामध्ये तुम्हाला उत्साहीत करणारी कामे सकाळीच करा. ह्या उत्साहीत करणाऱ्या कामांमुळे रोज सकाळी उठण्यासाठी रोज तुम्हाला नवी ऊर्जा मिळत राहील.


Regards

सकाळी लवकर उठण्यासाठी काही टिप्स
सकाळी लवकर उठण्यासाठी काही टिप्स 

 

(Image From) https://goo.gl/e7Wmzp

Post a Comment

0 Comments