रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी

रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी


जसे नवीन वर्ष सुरु होते तसे बरेच लोक जिम जॉईन करण्यापासून ते अनेक पुस्तकं वाचेपर्यंत असे अनेक संकल्प करत असतात. पण खरंच ह्या गोष्टी पूर्ण होतात का? नेहमीच्या कामातून जर वेळ काढला तर हे नक्की शक्य आहे. पण बरेच लोक ठरवलेला संकल्प पूर्ण करत नाहीत. आपल्यातील नकारात्मकता झटकून नव्याने काम करायला सुरुवात केली की आयुष्यातील अनेक गोष्टी बदलु शकतात. आपल्यामधील सकारात्मकता वाढवण्याची ताकद आपल्यातच असते. ती ताकद आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि तसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर हे नक्की शक्य आहे. फक्त त्याला थोडीशी संयम आणि नियमांची गरज आहे. आत्तापासून संकल्प करा, जेणेकरून तुमच्या आयुष्यात सकरात्मक बदल निश्चित झालेला असेल. 
नेहमी आनंदी राहा!
माणसाच्या आयुष्यात नेहमी चांगले आणि वाईट प्रसंग हे येतच असतात पण ह्यामध्येही आपण शांत राहून क्रिटिकल सिच्युवेशनला सामोरे गेले पाहिजे. अशी सवय जर आपण स्वतःला लावून घेतली तर  आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडेल. ह्यासाठी सर्वात सोप्पी गोष्ट म्हणजे लहान गोष्टींसाठी थँक्स म्हणणं आणि प्रत्येक चुकीला सॉरी म्हणणं, जर असे आपण जाणीवपूर्वक केले तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच म्हटले आहे की सदैव हसत राहा आणि आनंदी राहा.

नाटक पाहायला जा
आज तसे पाहायला गेले तर मनोरंजनाचे साहित्य म्हणजे मोबाइल आणि टीव्ही झाले आहे पण माझ्या मते मनोरंजनाचं सगळ्यात उत्तम माध्यम म्हणजे नाटक. नाटकांमधून जी  जिवंत कलाकृती अनुभवयाला मिळते ती कोणत्याच माध्यमातून मिळत नाही. जर आपल्याला आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा असं वाटत असेल तर महिन्यातून निदान एक तरी नाटक पाहावे.

निसर्गाच्या सानिध्यात राहा:
आपल्या सगळ्यांनाच फिरायला जायला आवडते. पण आपण आपल्या बिझी शेड्युल मध्ये असा कितीसा वेळ काढून जातो, ह्यावर जरा नीट विचार करायला हवा. पण जर एक निरोगी आयुष्य जगायचे असेल तर साधारण ३ महिन्यातून एकदा तरी आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावे. ह्यात आपल्या मेंदूलापण एक प्रकारचा तजेलदारपणा येतो आणि आपण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागतो.

स्वतःशीच स्पर्धा करा 

बरेच जण नेहमी त्यांच्या क्षेत्रामध्ये दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करायला जातात पण खरी स्पर्धा ही दुसऱ्यांशी नसून आपल्या स्वतःशीच असली पाहिजे. तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता? आजपासून एक गोष्ट नक्की करा. दिवसाची सुरवात एखादं उद्दिष्ट्यं डोळ्यासमोर ठेवून करा आणि प्रत्येक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, दर दिवशी ठरवलेलं उद्दीष्ट्य हे गेल्या दिवशीच्या उद्दिष्टापेक्षा थोडंसं वरचढ ठेवा. म्हणजेच इतरांशी स्पर्धा लावण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करा. ठरवलेले सगळे टार्गेट पूर्ण करा. एखादे वेळी उद्दिष्ट पूर्ण नाही झालं तरी दुःखी न होता त्यातून काय शिकलात ह्याचा नीट अभ्यास करून मग पुन्हा कमला लागा.

Regards

रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी

रोजच्या जीवनातले हे बदल देतील आयुष्याला सकारात्मक दृष्टी

 


Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या