अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!

अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!


हास्य हे सर्वच आजारांवरचे मुख्य औषध आहे आणि तज्ज्ञ मंडळीसुद्धा नेहमीच आपल्याला हसतमुख राहण्यास सांगतात. आयुष्यामध्ये आनंद आणि दुःख ह्या गोष्टी तर होतच असतात, पण आपण त्या प्रत्येक परिस्थितीला कसे सामोरे जातो हे खूप महत्वाचे आहे. कुठलीही परिस्थिती असो जर आपण नेहमीच प्रसन्न आणि हसत राहिलो तर समस्या काहीशा हलक्या होतात. हास्य फक्त तुमच्या व्यक्तिमत्वाला खुलवत नाही तर प्रेरणा आणि सामर्थ्य देते. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, असे म्हटले जाते. ते अगदी खरं आहे. कारण हसल्याने फक्त चेहरा सुंदर दिसत नाही तर आरोग्यही चांगले राहते. जाणून घेऊया हास्याचे काही फायदे..

 

रक्तप्रवाह सुरळीत होतो

डॉक्टर आणि संशोधकांनुसार, हे सिद्ध झालेले आहे की हसल्याने रक्तप्रवाह अधिक चांगल्या प्रकारे होतो. हसतमुख राहिल्याने मान, चेहरा आणि त्वचा याला चांगला स्ट्रेच मिळतो. त्यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन उत्तम पद्धतीने होते. हास्यामुळे आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना अगदी सहज सामोरे जाऊ शकतो.

 

ताण-तणाव कमी होईल

ताण-तणाव, चिंता, काळजी, आनंद ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग आहेत पण जर आपल्याला कुठल्या गोष्टीची चिंता असेल तर त्यावर मात करण्याचा प्रभावी उपाय हास्यात आहे. आपल्या मेंदूवर, शरीरावर पडणारा तणाव दूर करण्यासाठी हास्य फायदेशीर ठरतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार,  जी व्यक्ती आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगांना प्रसन्नतेने आणि शांतपणे  तोंड देते अशी व्यक्ती नेहमीच आनंदी आणि हसतमुख असते कारण ती व्यक्ती कोणत्याही बाह्य परिस्थितीचा परिणाम स्वतःवर होऊ देत नाही.

 

मेंदूत सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो  

आपल्या संपूर्ण शरीराचे नियंत्रण हे आपल्या मेंदूद्वारे केले जाते पण ह्याच मेंदूवर जर कोणताही ताण आला तर त्याचा आपोआपच परिणाम आपल्या शरीरावरदेखील होतो. जर आपण जाणीवपुर्वक आपले जवळचे मित्र, कुटुंबिय यांच्यासोबत हास्यविनोद केले तर मनावरील ताणाचे ओझे हलके होवून शरीरात सकारात्मक ऊर्जा संचारण्यास मदत होईल. अशी सकारात्मक ऊर्जा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. खुलेपणाने हसल्याने शरीर व मन हलके, रिलॅक्स होते, ज्यामुळे शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढते. वेळ काढून आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर फिरायला जावे ज्याने मन अगदी प्रसन्न होईल.

Regards

अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!

अनेक आजारांवर परिणामकारक ठरेल तुमचे हास्य!

 

(Image From) https://goo.gl/y14tRB

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या