वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे

वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे   


हल्लीची जीवनशैली ही जास्त वेळ कॉम्पुटर समोर बसून काम करण्याची आहे. आज जगातील ७०% लोक हे चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारी पडत आहेत आणि हे एका संशोधनानुसार सिद्ध झालेले आहे. बदललेली जीवनशैली अनेक आजारांना आमंत्रण देत आहेत. त्याचा परिणाम म्हणून वजन अचानक वाढणे, ऍसिडिटीचा त्रास, लो इम्युनिटी सारख्या गोष्टी अनेक लोकांबरोबर घडत आहेत. ह्या अशा गोष्टी नेहमी तपासून पाहिल्या पाहिजेत किंवा त्याविषयी निरीक्षण नेहमीच नोंदवत राहिलं पाहिजे, यामुळे आपल्याला त्यांची करणे समजून येतील. वजन वाढण्याचे प्रमाण हे जागतिक स्तरावर मोठे आहे यामुळे वजन कसं नियंत्रणात आणता येईल, हे वेळच्यावेळी केलेल्या निरीक्षणावरून लगेच लक्षात येईल.


आहारातील समतोल

आपण जे रोज अन्न खातो ते रोजच्यारोज योग्य प्रमाणात डायजेस्ट होणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे  म्हणूनच रोजचे खाणे आणि कॅलरी बर्न करणं या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल राखणं गरजेचं आहे.  जर याचा समतोल राखला नाही तर वजनात बदल होतो. तुम्ही जास्त खाल्लं आणि कमी प्रमाणात कॅलरी बर्न केल्या तर वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

 

नियमित व्यायाम

आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी वर्कआऊट करणे खूप गरजेचे आहे त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. नाहीतर आपण रोज अर्धा तास तरी चालायला गेले पाहिजे ज्यामुळे आपल्या जास्तीत जास्त कॅलरी बर्न होतील.

 

नियमित ब्रेक फास्ट करा

बऱ्याच लोकांना ब्रेक फास्ट स्किप करण्याची सवय असते, पण असे केल्याने वजन वाढण्याची खूप शक्यता असते. कारण ब्रेक फास्ट न केल्याने आपल्या शरीराला योग्य ते पोषण मिळत नाही आणि आपल्याला सतत भूक लागत राहते आणि अशा वेळेस बरेच लोक फास्ट फूडचे सेवन अधिक करतात.


वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे

वजन वाढण्याची काही महत्वाची कारणे   

Regards

 

(Image From) https://goo.gl/1bExo9  

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या