तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!

तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!  


आज मोबाइल ही एक खूपच गरजेची वस्तू झाली आहे. ती जर जवळ नसेल तर आपण खूपच कमी कामे करू शकू. पण ह्या मोबाइलच्या पण किती आहारी जायचे ते पण आपण नक्की ठरवले पाहिजे. कारण मी आत्ता जसे म्हंटले त्याप्रमाणे आजच्या टेक्नॉसॉव्ही जगात टेक्नॉलॉजीपासून दूर राहणे कठीण आहे. पण, त्याचा अतिरेक करणे वाईट. ह्यातच बऱ्याच लोकांना कानात हेडफोन घालून ऐकण्याची सवय असते. जर कानात हेडफोन घालून सतत गाणी ऐकण्याची, आवाज ऐकण्याची सवय असेल तर, सावधान! तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.

कानदुखी: 
बऱ्याच लोकांना कानात सतत हेडफोन घालून गाणे ऐकायची सवय असते पण सातत्याने कानात हेडफोन घालून संगीत ऐकण्याची सवय ही कानदुखीला निमंत्रण देणारी ठरते. त्यामुळे हा त्रास वाढण्यापूर्वी वेळीच काळजी घ्या.
बहिरेपणा: 
आपले कान निसर्गाने दिलेली अमूल्य देणगी आहे. पण, किती प्रमाणात आवाज ऐकायचे हे सुद्धा ठरलेले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आपले  कान फार तर, ६५ डेसिबल पर्यंतचा आवाज सहन करू शकतात. आपण जर सातत्याने काही तास हेडफोन लाऊन आवाज ऐकत असाल तर, कानाच्या समस्या लवकरच उद्भवू शकतात.
झोपेच्या समस्या: 
सातत्याने हेडफोन लावने हे अतिशय धोकादायक आहे. सातत्याने हेडफोन वापरल्याने चिडचिडेपणा वाढतो. तसेच, झोपेच्याही समस्या उद्भवतात. अती हेडफोन वापरामुळे निद्रानाशाचा विकार होऊ शकतो.
मेंदूवर परिणाम: 

कितीही झाले तरी हेडफोन हे एक विद्यूत चुंबकीय यंत्र आहे . सातत्याने हेडफोन वापरल्याने हेडफोनमधील चुम्बकीय तरंग आपल्या मेंदूपर्यंत गंभीर लहरी पोहोचवतात. अनेकांना रात्री कानात हेडफोन टाकून गाणी ऐकण्याची सवय असते. त्यांना विसरभोळेपणाचा त्रास संभवतो.

Regards

तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!

तुम्ही सतत हेडफोन वापरता का? सावधान!  

 

(Image From) https://goo.gl/vM2suw

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या