कायम ध्येयवादी राहा

कायम ध्येयवादी राहा


आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचार की, मला आयुष्यभर आरोग्य व तारुण्य हवे आहे काय? पण मी तुम्हाला येथे सांगू इच्छितो की तुम्ही खरोखरच तरुण आणि व्याधीरहित राहू शकता. 
कायम ध्येयवादी राहा

कायम ध्येयवादी राहा

पण ह्यासाठी एकाच गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे तुमचे विचार सतत सुंदर आणि पवित्र असले पाहिजेत. ज्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत पवित्र आणि सुंदर विचार असतात त्या सुंदर विचारांचे तेज कायमच त्यांच्या चेहऱ्यावर दिसते.
जी व्यक्ती आपले आयुष्य नीतीने व सदाचाराने जगतो तो माणूस कायमच तरुण दिसतो. चांगल्या विचारांनी माणसाचे नैतिक आणि शारीरिक सामर्थ्य कायम वाढतच राहते. यशस्वी होण्यासाठी आपण कायमच आपल्यासमोर उच्च आदर्श ठेवावा. एक गोष्ट इथे आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे जर एखाद्या व्यक्तीसमोर उच्च आदर्श नसतो त्याच्या आयुष्यात ध्येय प्राप्तीसाठी अनंत अडचणी येऊ शकतात. ह्या जगात जर आपल्याला मानव जन्म प्राप्त झाला आहे तर आपण तो जन्म सार्थकी लावला पाहिजे. जो माणूस आपल्या आयुष्यात योग्य ध्येय बाळगतो त्याला सर्व जग सुंदर दिसू लागते. ध्येयवादी माणूस त्याची दिवसातली प्रत्येक कामे अतिशय कौशल्याने करतो. 

ध्येयवादी माणसे आपली कामे नेहमी वेळेत पूर्ण करतात आणि कोणतेच काम अपुरे ठेवत नाहीत. त्यांच्या मनात त्यांच्या ध्येयाविषयी असलेली आकांशा नेहमीच पूर्ण होते. त्यासाठी आशा, श्रद्धा, आपल्या कामावर असलेले प्रेम आणि कोणतेही परिश्रम करायची त्यांची तयारी असते. पण हे सर्व शक्य होते केवळ  समोर कोणतातरी योग्य आदर्श ठेवल्यामुळे कारण त्यामुळेच त्यांच्या मनाचे सामर्थ्य वाढते व त्यामधूनच त्यांच्या मनातील इच्छा सहजपणे पूर्ण होतात. म्हणूनच जीवनात कायमच महान माणसांचा आदर्श आपल्या समोर आपण ठेवला पाहिजे व त्यांनी त्यांच्या आयुष्यात यशप्राप्तीसाठी जे काही केले त्याचा आढावा घेऊन आपण आपली रणनीती ठरवली पाहिजे आणि त्यानुसार आपले कार्य सुरू केले पाहिजे. मग हे आदर्श कोणतेही महान व्यक्तींचे असले तरी काही हरकत नाही त्यांच्या उच्च यशाचे रहस्य आपल्याला त्यांच्यावर आधारित कादंबऱ्यातून अथवा इंटरनेटवरून सहज उपलब्ध होऊ शकते. अशा थोर आदर्शांमुळेच तुमच्या अंगी तुम्ही कार्यरत असलेल्या क्षेत्रात उच्च ध्येयाकडे मार्गक्रमण करण्यास योग्य असा मार्ग सापडेल आणि तुम्ही देखील उच्च यश संपादन करू शकता आणि मग तुमचे पाऊल तुमच्या ध्येयाकडे सहजच पडेल. 

  https://bit.ly/2DYkUYw


Regards


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या