मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे

मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे   


मका हा सर्वांच्याच आवडीचा पदार्थ आहे, भाजलेलं मक्याचे कणीस, उकडलेला मका हे बरेच लोक आवडीने खातात. मका अत्यंत पौष्टीक असून त्यात फायबर्स अधिक प्रमाणात असतात. फायबर्स आपल्या शरीराला खूपच उपयोगी असून त्याने आपल्या भूकेवर कंट्रोल राहते तसेच पोटाच्या समस्येसाठीही हे एक उत्तम खाद्य आहे.

कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते
सध्या वाढत्या कोलेस्ट्रॉलच्या समस्या ही अनेक आजारांना निमंत्रण देते आणि सध्याच्या लाइफ स्टाइलमुळे बऱ्याच लोकांना ह्या समस्येने ग्रासलेले आहे. मक्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी मका फायदेशीर ठरतो.

हाडे बळकट होतात
आजकाल बरेच लोक एअर कंडिशनमध्ये काम करतात त्यामुळे अशा लोकांना कालांतराने हाडांच्या समस्या उद्भवतात. मक्यात मॅग्नेशियम आणि आर्यन असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. याव्यतिरिक्त मक्यात झिंक आणि फॉस्फरस असते. त्यामुळे हाडासंबंधित रोग दूर होण्यास मदत होते.

शरीराला ऊर्जा मिळते
मानवी शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जेची आवशक्यता असते पण हल्ली ह्याच कारणांमुळे अनेक लोकांना कामामध्ये परफॉर्म करताना अडचणी येतात. मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.

 

दृष्टी सुधारते 

सतत कॉम्पुटर आणि मोबाइलच्या वापरामुळे आज अनेकांना डोळ्यांच्या समस्या उद्भवत आहेत. मका डोळ्यांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. कारण त्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. त्यामुळे दृष्टी सुधारते.

पोटाच्या समस्यांना आळा बसतो 

आजच्या लाइफ स्टाइल मध्ये बऱ्याच लोकांचे जेवण अवेळी होते ह्या अशा अवेळी खाण्यामुळे अॅसिडीटी सारख्या समस्या उद्भवतात, मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. 

Regards

मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे

मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे 

 

(Image From) https://goo.gl/wdD21S

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या