हाडे बळकट होण्यासाठी काय करावे ???

हाडे बळकट होण्यासाठी काय करावे ???


आपल्याला जर आपले आरोग्य चांगले राखायचे असेल तर आपण रोजच्या रोज नियमित व्यायाम केला पाहिजे त्याचबरोबर योग्य संतुलित आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. 
हाडे बळकट होण्यासाठी काय करावे ???

हाडे बळकट होण्यासाठी काय करावे ???

बऱ्याचदा लोकं व्यायाम कटाक्षाने करतात किंवा रोज सकाळी चालायला देखील जातात पण बऱ्याचदा चुकीच्या आहार पद्धतींमुळे हवा तसा रिझल्ट येत नाही , अशावेळेस एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे  जसे आपण आपले शरीर चांगले ठेवण्यासाठी व्यायाम करतो त्याचप्रमाणे आपण आहारदेखील तसाच घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या हाडांची मजबूती वाढण्यास मदत होईल. कारण चांगल्या आरोग्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे.कारण आपल्या शरीराच्या संपूर्ण कार्यामध्ये हाडे फार महत्वाची आहेत तसेच ती आपल्या शरीराला एक आकार देण्यासाठीही खूपच उपयुक्त ठरतात. तर मग शरीराच्या ह्या महत्वाच्या अवयवाला मजबूती येण्यासाठी आपण कोणता आहार घेतला पाहिजे ते आपण पाहुयात.


आपल्या सर्वांना हे तर माहीतच आहे की,

[ आरोग्य राखण्यासाठी हाडांची मजबूतीही गरजेची आहे. हाडे कल्शियम आणि मिनरल्सपासून बनलेली आहेत. आपल्या शरीराची हालचाल हाडांशी निगडीत असल्याने ती बळकटे असणे आवश्यक आहे. म्हणून हाडे बळकट होण्यासाठी आहारात या ७ पदार्थांचा समावेश करा...
मासे
माशांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. हाडांच्या बळकटीसाठी त्याची आवश्यकता असते. त्याचबरोबर माशांमधील ओमेगा ३ फॅटी अॅसिडमुळे हाडांची झीज होत नाही.
हिरव्या पालेभाज्या
पालेभाज्या या कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे पालक, मेथी, कोबी, ब्रोकोली यासांरख्या भाज्या अवश्य खा.
अंड
अंड्यात प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचबरोबर त्यातील व्हिटॉमिन डी हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरतात.
संत्र 
संत्र्यातील व्हिटॉमिन सी हाडे बळकट करण्यासाठी उत्तम ठरतं. 
बदाम
यात पोटॅशियम, ओमेगा ३ फॅटी अॅसिड, कॅल्शियम यांसारखे घटक असल्याने ते हाडे बळकट होण्यासाठी फायदेशीर ठरतात.
मनुके
ऑस्टियोपिरॉसिस असलेल्या महिलांसाठी मुठभर मनुके खाणे गरजेचे आहे. त्यात इनुलिन नावाचे फायबर असते जे शरीरासाठी कॅल्शियमचे शोषण करण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करते. अर्थरायटिसच्या समस्येवरही मनुके खाणे फायदेशीर ठरते.
केळं
केळ्यात पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण अधिक असते. हे तीनही घटक हाडांच्या मजबूतीसाठी मदत करतात. ]सौजन्य

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  
https://goo.gl/Wib57Cखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा:   

आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा: 

1) स्वतःवर प्रेम करा

2)  झोपेचे महत्व 

3) समजूतदार पालक होण्यासाठी काही टिप

4) जीवनशैलीत बदल करा

5) ताण कसा कमी कराल?


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या