शनिवार, २४ मार्च, २०१८

यामुळेच जपानी लोक जास्त जगतात:

यामुळेच जपानी लोक जास्त जगतात:


आज जगात अशी कोणतीही व्यक्ती शोधून सापडणार नाही जी स्वतःचे आरोग्य चांगले राहावे म्हणून कोणतेही प्रयत्न करत नसेल आणि त्यातूनही दीर्घ आयुष्य लाभावे यासाठी प्रयत्न करणारे सुद्धा लाखो करोडो लोक आज आपल्या आजूबाजूला पाहायला मिळतील. 
यामुळेच जपानी लोक जास्त जगतात:

यामुळेच जपानी लोक जास्त जगतात:

पण आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे हे काम सुद्धा मेहनतीचे होऊन बसले आहे. पण एक देश असा आहे ज्या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटले जाते आणि ह्याच देशातली जवळ जवळ ८०% जनता ८० वर्षांपेक्षा जास्त जगते. तुम्ही अगदी योग्य ओळखलंत मी जपान ह्या देशाविषयी बोलत आहे.  तर मग पाहुयात काय आहे  ह्या देशातील लोकांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य. 
[ जगातील अन्य देशांतील लोकांच्या तुलनेत जपानी लोक अधिक स्वस्थ आणि फिट असतात. ते आपल्या आरोग्याबाबत ते फारच जागरुक असतात. याच कारणामुळे जपानी लोकांचे आयुष्य अधिक असते. जपान असा देश आहे जिथे पुरुष साधारणपणे ८० वयापर्यंत जगतात तर महिला ८६व्या वयापर्यंत जगतात. याचाच अर्थ जपानी लोक जगातील इतरांच्या तुलनेत अधिक जगतात. या मागचे रहस्य तरी काय आहे? घ्या जाणून
भाज्या 
जपानी लोक भाज्या खूप खातात. या लोकांच्या मते भाज्या खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. तसेच अधिक वर्षे जगता येते. यांचे जेवण अतिशय संतुलित असते. जपानी लोकांच्या थाळीत अर्ध्याहून अधिक हिरव्या भाज्या असतात. याशिवाय विविध डाळींचे सेवन करतात.

ग्रीन टी

जगभरात केल्या गेलेल्या सर्व्हेमधून असे समोर आलेय की ग्रीन टी वजन घटवण्यात फायदेशीर आहे. ग्रीन टीमुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. जपानी लोक दिवसांतून कमीत कमी दोन कप ग्रीन टी घेतात. 

ब्रेकफास्ट 

जपानी लोकांसाठी नाश्त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यांच्या नाश्त्यामध्ये ग्रीन टी, स्टीम राईस, टोफूसह मिसो सूप, हिरवा कांदा, ऑम्लेट आणि माशाच्या तुकड्याचा समावेश असते.

सी फूड

जपानी लोकांनी सी फूड खायला आवडते. चिकन, मटण अथवा बीफपेक्षा ते सी फूडला पसंती देतात. समुद्रातील मासे त्यांना विशेष आवडतात. यूएनच्या रिपोर्टनुसार जपानमध्ये दरवर्षी 100,000टन सी फूडची विक्री होते.

ऑनसेन-हॉट स्प्रिंग 

जपानचे लोक आपले शरीर सुंदर बनवण्यासाठी तसेच डोके शांत ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचा डाएट घेतात. याला ऑनसेन-हॉट स्प्रिंग असे म्हटले जाते. ]


सौजन्य 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...