स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या!

स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या! 
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य टिकवून ठेवणे हे खूपच महत्वाचे झालेले आहे. 
स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या!

स्वत:च्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या! 

आजच्या स्पर्धात्मक युगात लहान मुले आणि मोठ्यांना त्यांच्या रोजच्या आयुष्यात अनेक गोष्टींमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी झगडावे लागत आहे. म्हणूनच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.


१) चांगल्या आरोग्यासाठी रोज व्यायाम केला पाहिजे, पण जर तसे नसेल जमत तर साधारणपणे दिवसभरात ३० ते ६० मिनिटे चालावे, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

२) आपल्या रोजच्या दिनक्रमामध्ये व्यायामासाठी योग्य वेळ निश्चित करून नियमितपणे व्यायाम करा.

३) ज्याचे श्वासावर योग्य नियंत्रण असे त्याला मनावरही ताबा मिळवता येतो तसेच  श्वासोच्छवास आपल्या जगण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात, म्हणूनच दररोज ध्यानधारणा आणि प्राणायाम करण्याची एक वेळ निश्चित करा.

४) आपापल्या क्षमतेप्रमाणे स्नायूंना आराम मिळण्यासाठी एक्सपर्टच्या साहाय्याने योग्य प्रकारचे व्यायाम करा.

५) दिवसभरात शक्यतो ८ ते १० ग्लास पाणी जरूर प्यावे.

६) वजन नियंत्रणात राहण्यासाठी जास्त व्यायाम करू नका. नियमित आणि योग्य व्यायाम, संतुलित आहार आणि भरपूर पाणी पिण्यास प्राधान्य द्या.

७) रोजच्या धावपळीत येणाऱ्या ताण तणावाला कमी करण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर वेळोवेळी संवाद साधा.
अशा प्रकारे आपण जर आपल्या आरोग्याची नियमितपणे काळजी घेतली तर त्याचे दीर्घकालीन चांगले परिणाम आपल्याला उपभोगता येतील. 

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या