आपली मुले होतील हेल्दी आणि आनंदी!

आपली मुले होतील हेल्दी आणि आनंदी!
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बऱ्याच जणांना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हेल्दी राहणे आवश्यक झाले आहे पण त्याच बरोबर हल्ली लहान मुलांनासुद्धा ह्याची नितांत गरज भासू लागली आहे. 
आपली मुले होतील हेल्दी आणि आनंदी!

आपली मुले होतील हेल्दी आणि आनंदी!

ह्यासाठी हल्लीचे पालक आपल्या मुलांना स्मार्ट आणि हेल्दी बनवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी करून घेत आहेत.
पण येथे काही गोष्टी अशाही आहेत ज्या मुलांच्या पालकांनीही करणे तितकेच आवश्यक आहे. आपल्या मुलांना हेल्दी आणि आनंदी ठेवण्यासाठी काही खास गोष्टी येथे दिलेल्या आहेत, त्यांची जर योग्य अंमलबजावणी केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल.

१) मुलांना शाळेत पाठवतांना रिकाम्या पोटी पाठवू नका. बरेचदा काही पालक मुलांना डब्यामध्ये चिप्सचे पॅकेट फोडून देतात. परंतु जर आपण आपल्या मुलांना सकाळी उठल्यावर दूध किंवा इतर पौष्टीक पदार्थ दिलेत तर त्यांना दिवसभर ऍक्टिव्ह राहण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.

२) प्लॅस्टिकच्या डब्यातून अन्न देण्यापेक्षा मुलांना स्टीलच्या डब्यातून घरी बनवलेले पदार्थ द्या. पाण्याची बॉटल शक्यतो धातूची असावी, ह्यासाठी हल्ली बऱ्याच सुपर मार्केटमध्ये स्टीलच्या बॉटल उपलब्ध आहेत.

३) सर्वच लहान मुलांना टीव्ही पाहायला आवडतो, अशा वेळेस त्यांना पूर्णपणे मनाई न करता थोडा वेळ म्हणजे अंदाजे ३० मिनिटे टीव्ही बघून द्यावा. कारण जास्त वेळ टीव्ही समोर बसल्यामुळे मुलांच्या डोळ्यांवर, स्फूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

४) पूर्वी आमच्या लहानपणी तूप आणि गुळ घातलेली पोळी आमची आई आम्हाला देत असे तसेच तुम्हीही तुमच्या मुलांना दिवसातून एकदातरी तूप आणि गुळ घातलेली पोळी खायला द्या. कारण हल्लीच्या बदलत्या वातावरणात इंफेक्शन, ताप यापासून बचाव करण्यासाठी अशी पोळी खूपच उपयुक्त ठरते.

५) हल्ली सगळीकडेच फास्ट फूडचा जमाना आहे आणि ते मोठयांनासुद्धा आकर्षित करते, म्हणून बरेच वेळा मुलांचे पालक मुलांनादेखील फास्ट फूड देऊन खुश करण्याचा प्रयत्न करतात, पण ह्या सर्व गोष्टींपासून एक पालक म्हणून आपण स्वतः आधी दूर राहिले पाहिजे आणि मुलांना मोकळ्या ठिकाणी खुल्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात न्यावे आणि नैसर्गिक अन्नच खावे.

Regards
Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या