ताण कसा कमी कराल?

ताण कसा कमी कराल?
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागते आणि आलेला ताण दूर होण्यासाठी ताणाचं मूळ कारण दूर होणं अत्यंत आवश्‍यक असतं. 

ताण कसा कमी कराल?

त्यासाठी ताण निर्माण करणारी परिस्थिती नेमकी समजून घेतली पाहिजे.
तरच त्यातली समस्या आपल्याला स्पष्ट दिसेल. माणसाचं मन शांत असणं ही एक आदर्श स्थिती आहे, कारण प्रत्येक जण आपल्या ध्येयामागे धडपड करत असतो या प्रयत्नात त्याचं मन कायमच गुंतलेलं असतं. त्यामुळे काही ना काही कारणाने मन बऱ्याचवेळा अशांतच असतं. अशावेळी मनावर ताण निर्माण होतो.
आज प्रत्येकालाच उत्कर्ष व मन:शांती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी पाहिजे असतात. उत्कर्ष आणि मनाची शांती यांच्यातला संघर्ष हा मानवी जीवनातला मूलभूत संघर्ष आहे. उच्च यश हवे असेल तर कष्टाची गरज असते आणि त्यासाठी मनात कायम प्रेरणा असावी लागते. प्रेरणेच्या अभावी माणूस काहीही करू शकत नाही. आपल्याला आलेला ताण दूर होण्यासाठी ताणाचं मूळ कारणच दूर होणं आवश्‍यक असतं. पर्यायांने मनाला शांतता लाभत नाही. 

त्यासाठी ताण निर्माण करणारी परिस्थिती आपल्याला नेमकी समजायला हवी. ती नेमकी समजली तरच त्यातली समस्या आपल्याला स्पष्ट दिसेल. मग तिची संभाव्य उत्तरं लक्षात घेऊन ती कोठे आणि कशी मिळवता येतील याची रूपरेषा आपल्याला आखता येते. त्याद्वारे आराखडा ठरवून कृती केली की, ताणाचा निचरा होईल.

१) ताणाचा निचरा होण्यासाठी प्रभावी मार्ग म्हणजे रोजचा व्यायाम. मात्र ताण असताना कोणताही व्यायाम करण्यापेक्षा असाच व्यायामप्रकार निवडावा की ज्यामध्ये शरीराच्या अनेक सांध्यांची हालचाल होईल, पण दमछाक होणार नाही. यात पायी चालणं, सायकल चालवणं, योगासनं इ. समावेश आपण करू शकतो.

२) ताणाचा निचरा करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे रोजच्या रोज किमान अर्धा तास तरी पायी फिरायला जाणं. या प्रकारात मानसशास्त्रीयदृष्ट्या आणखी एक फायदा होतो तो म्हणजे समस्या निर्माण झालेल्या ठिकाणापासून शरीरदृष्ट्या आपण दूर जातो. अशाप्रकारे दूर गेल्यानंतर आपलं मनही त्या समस्येपासून दूर जातं. त्यामुळे या बदलाचा मनावर परिणाम होतो आणि ते उल्हासित होतं.

३) आपल्या मनाला रोजच्या धकाधकीतून बदलाची वेळोवेळी नितातं गरज असते. हा बदल जागेचा, वातावरणाचा, परिसराचा, कामाचा, तसेच रोजच्या कपड्यांचा, भेटणाऱ्या माणसांचा, दैनंदिन कार्यक्रमाचा असा कशातलाही बदल मनाला ताजतवानं करू शकतो आणि मनाची प्रसन्नता वाढवू शकतो. म्हणून अशा प्रकारचा बदल मनाला लाभतो आहे की नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे.

४) आपल्या मनाला सतत व्यग्रतेची गरज असते. जेंव्हा काम नसते तेंव्हा माणसाला कंटाळा येऊ लागतो त्यामुळे मनात कधी कधी  नकारात्मक विचार येऊ लागतात. म्हणूनच आपण संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक बनवले पाहिजे ज्यामुळे आपले मन सतत व्यस्त राहील.

अशाप्रकारे काही सोप्प्या तर्हेने आपण आपल्यासाठी मनः शांती सहज मिळवू शकतो.

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या