जीवनशैलीत बदल करा

जीवनशैलीत बदल करा 
बरेच जण हल्ली रात्री झोपण्यापूर्वी सकाळी लवकर उठून व्यायाम करण्याचा विचार करतात, पण काही लोकांनाच सकाळी लवकर उठणे शक्य होते. 
Cheerful woman posing in field Free Photo

जीवनशैलीत बदल करा 

रोजच्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीचा आजच्या पिढीवर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या वाईट परिणाम होताना दिसून येत आहे.
त्यामुळे  दिवसभराच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ काढणे गरजेचे आहे. पण जर आपण आपल्या जीवनशैलीत काही लहान बदल केल्यास तुम्हाला निरोगी आयुष्य लाभेल.

जमेल तेवढ्या शारीरिक हालचाली करा.
कामाच्या वाढत्या व्यापामुळे, आधुनिक जीवनशैलीमुळे आणि वाढत्या वयानुसार अवयवांचे काम करणे काहीसे मंदावलेले दिसून येते. पण तुम्ही न थांबता व्यायाम अथवा रोजचे काम करणे बंद करु नका. शक्य असेल तिथे जिने चढा. चाला, फिरा. अशा काहींना काही शारीरिक हालचाली चालू राहू द्या. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास खूपच मदत होईल.

वजन नियंत्रित ठेवा
नेहमी सात्विक, संतुलित आहार घ्या. अशामुळे वजन गरजेपेक्षा अधिक वाढणार नाही. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा आवर्जून समावेश करा. फास्ट फूड पासून शक्य तेवढे लांबच राहा. आपल्या आहारात दूध, अंडी यासारख्या पदार्थांचा समवेश करा, त्यामुळे शरीराला प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतील. अशा संतुलित आहाराने शरीराचे वजन नियंत्रित राहिल.

नेहमी आनंदी राहा
घरी किंवा ऑफिसमध्ये नेहमी हसऱ्या चेहऱ्याने वावरा, कुटुंबातील सदस्यांसोबत, मित्रमंडळींसोबत हसत खेळत राहा. त्यामुळे तुमचे शरीर आणि मन शांत होण्यास मदत होईल. थकवा दूर होईल आणि तुम्ही प्रसन्न रहाल.Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या