चहा आणि रोटी आरोग्यासाठी धोकादायक

चहा आणि रोटी आरोग्यासाठी धोकादायक

आरोग्य तज्ज्ञांनी नेहमीच सांगितले आहे की दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते. पण आजकालची जीवनशैली ही खूपच धावपळीची आहे त्यामुळे बरेच लोक ब्रेक फास्ट न करताच कामावर जातात किंवा मग लवकर जायचे म्हणून रेडी टू इटचे काही पदार्थ खाणं पसंत करतात. परंतू अनेक घरात आजही सकाळी बनणारी गरम गरम चपाती आणि चहा हा नाश्त्याचा हमखास पदार्थ आहे. पण चहा चपाती खाऊन बाहेर पडणं खरंच हेल्दी आहे का? 

एक्सपर्ट सल्ला 

आहारतज्ञांच्या म्हणण्यानुसार सकाळचा नाश्ता भरपेट पण हेल्दी आणि आरोग्यास पोषक असा असला पाहिजे. पण ब्रेक फास्ट्ला चहा चपाती हा पर्याय फारसा आरोग्यदायी नाही. चहा चपाती एकत्र खाल्ल्याने त्यामधून मिळणारी पोषकद्रव्य फारच कमी असतात. सकाळी उठल्यानंतर शरीराला दिवसभर लागणारी उर्जा सकाळच्या नाश्त्यामधून मुबलक मिळणे गरजेचे आहे. सकाळच्या खाण्यामधून आपल्याला प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, आणि कार्बोहायड्रेट अशा प्रकारचे घटक मुबलक मिळणे गरजेचे आहे. चहा चपातीमधून ही गरज पूर्ण होत नाही. चहा चपाती हा पर्याय आवश्यक असणारी कार्बोहायड्रेट, आयर्न आणि कॅल्शियमची गरज पूर्ण करत नाही.

चूकीचे कॉम्बिनेशन  

सर्वांनाच माहित आहे की चहा हे कॅफिनयुक्त पेय असून दिवसाने त्याची सुरूवात करणं आरोग्यदायी नाही. कोणताही अन्नपदार्थ चहासोबत घेणे त्रासदायकच आहे. तसेच चहा चपाती  या कॉम्बिनेशनमधून आयर्न आणि कॅल्शियम शरीरात मुबलक प्रमाणात शोषले जात नाही. त्यामुळे शरीराला आवश्यक असे अन्नघटक मिळत नाही.

 

नाश्त्याला हेल्दी पर्याय कोणते? 

चहा आणि चपाती हा जरी झटपट पर्याय असला तरी तो न घेता आपण जाणीवपूर्वक भाजी चपाती किंवा दही चपाती, अंड, दूध, पनीर अशा पदार्थांचा आहारात योग्य तज्ज्ञांच्या मदतीने समावेश करावा.


Regards

चहा आणि रोटी आरोग्यासाठी धोकादायक

चहा आणि रोटी आरोग्यासाठी धोकादायक

 

(Image From) https://goo.gl/rEy7Ch

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या