समजूतदार पालक होण्यासाठी काही टिप

समजूतदार पालक होण्यासाठी काही टिप

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे बऱ्याच पालकांना त्यांच्या रोजच्या कामातून स्वतःच्या मुलांकडे लक्ष्य द्यायला फारच थोडा वेळ मिळत आहे. 

Father reading funny story to girls  Free Photo

समजूतदार पालक होण्यासाठी काही टिप

म्हणूनच आपल्या मुलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालकांनी सर्वप्रथम स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे. यासाठी पालकांनी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमध्ये त्यांना कितीही प्रॉब्लेम्स असतील तरी स्वतः शांत आणि संयमी राहणे आवश्यक आहे. कारण बरेचदा पालक त्यांच्या कामावरचा किंवा इतर गोष्टींचा राग आपण मुलांवर काढतात आणि अशातच सगळंच बिघडून जाते आणि मनाची  चिडचिड होते. या सगळ्यात तुम्हाला शांत पालक होण्यासाठी या टिप्स नक्कीच मदत करतील.

१. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे तुमचे दिवसभरात तुम्ही सोडून अनेक व्यक्तींना भेटत असते. त्यामुळे साहजिकच ते इतरांकडून काही शिकत असते. परिणामी त्यांच्या वागण्यात बदल होऊ लागतात. अशावेळी जेव्हा तुम्हाला मुलांचे वागणे पटणार नाही तेव्हा त्यांच्यावर रागावण्याऐवजी मुलाला समजून घ्या आणि त्यांना योग्य आणि अयोग्य गोष्टींची जाणीव योग्य शब्दात करून द्या.

२. बर्याचवेळेला मुलं खूप जास्त दंगा मस्ती करतात. अशावेळी त्यांच्यावर आपण रागावतो पण अशावेळी पालक म्हणून सर्वप्रथम आपण शांतपणे न रागवता दीर्घ श्वास घ्या आणि काही वेळाने मूल शांत झाल्यावर त्याला प्रेमाने जवळ घेऊन कोमल शब्दात त्याची समजूत घ्याला.

३. काही मुले फारच हट्टी असतात आणि जेंव्हा मुलं जास्त हट्ट करतात किंवा मस्ती करतात तेंव्हा अशावेळेस पालक म्हणून आपल्याला नेहमीच प्रचंड राग येत असतो अशावेळेस तुम्ही शांत राहावे अथवा मुलांपासून थोडे दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे अथवा दुसऱ्या खोलीत जाऊन बसावे आणि जेंव्हा राग शांत होईल त्यानंतर परिस्थिती हाताळली पाहिजे.

४. जर तुमचे मुल जास्तच मस्ती करत असेल तर त्याला एखादी सौम्य शिक्षा तुम्ही देऊ शकता. पण त्यानंतर त्याला कोमल शब्दात योग्य आणि अयोग्य वागणुकीबद्दल जाणीव करुन द्या.

५. बऱ्याचदा आपली मुले आपल्यावरच चिडतात किंवा रागावतात अशावेळेस आपण पालक म्हणून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे आणि आपल्या मुलांवर चिडू अथवा रागावू नये. याऐवजी मुलांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, यामुळे नक्कीच फायदा होईल. तसेच जाणीवपूर्वक त्यांच्या रोजच्या गोष्टींकडे लक्ष्य देऊन त्यांना प्लेग्रुप, ड्रॉईंग क्लास किंवा इतर ठिकाणी, जेथे त्यांचा चांगला वेळ जाईल आणि त्यांना काहीतरी शिकता येईल अशा ठिकाणी त्यांचे नाव नोंदवावे.

Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या