झोपेचे महत्व

झोपेचे महत्व


हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आज बऱ्याच लोकांना झोपेच्या समस्या होताना दिसून येत आहेत आणि योग्यवेळी आणि पुरेशी झोप न घेतल्यास त्याचा थेट परिणाम आपले आरोग्य बिघडण्याने होऊ शकते. 
Young woman sleeping isolated on white Free Photo

झोपेचे महत्व

पण या झोपेचा आपल्या आरोग्याशी नेमका संबंध तरी काय, हे तपासण्यासाठी तज्ज्ञांनी एक प्रयोग केला आणि त्यात त्यांनी अनेक लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केला.
अभ्यास केलेल्या लोकांमध्ये सारेच जण ४५ किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले होते. ह्या तपासणीत त्यांना त्यामध्ये तीन प्रकारचे लोक आढळून आले, कमी झोपणारे, सर्वसाधारण झोप घेणारे  आणि गरजेपेक्षा जास्त झोपणारे.

तज्ज्ञांनी ह्या वर्गवारीवरून अशा निष्कर्ष काढला की ज्या व्यक्ती खूप कमी आणि खूप जास्त झोपणाऱ्या गटातील होत्या त्यांच्यात आरोग्याच्या तक्रारी तुलनेनं खूपच जास्त होत्या. हृदयविकार, टेन्शन, लठ्ठपणा, वजनवाढ, डायबेटिस.. अशा अनेक समस्यांनी त्यांना घेरलेलं होतं. त्या तुलनेत ज्यांची झोप योग्य आणि पुरेशी होती, असे लोक मात्र बऱ्यापैकी आरोग्यदायी होते आणि त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी खूपच कमी होत्या. ह्यात असेही आढळून आले की ह्या लोकांचे आजार जरी वेगगवेळे असले तरी त्यांचा मूळ संबंध झोपेशी निगडीत होता. अशातच मूळ कारण न सापडल्यामुळे बऱ्याचदा चुकीच्या ट्रीटमेंटमुळे मूळ आजार तसाच राहिला आहे. म्हणजे हृदयविकार, लठ्ठपणा, किंवा टेन्शन अशा प्रकारच्या आजारांवर ट्रिटमेंट घेतली जाते, मात्र तरीही आजार तसाच राहून जातो. कारण त्याचं मूळ हे बऱ्याचदा दुसऱ्याच कारणात असतं. त्यामुळे शास्त्रज्ञांनी आपल्या अहवालात असेही नमूद केले आहे की सर्वप्रथम आपण स्वतः आपली जीवनशैली तपासून पहिली पाहिजे आणि त्याची सुरवात प्रथम आपल्या रोजच्या झोपेने होते. तसेच तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की योग्य झोपेबरोबरच योग्य व्यायाम, आहार सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. जर ह्या गोष्टी आपण नीट पाळल्या तर बऱ्याच अंशी आपण आपले आरोग्य चांगले राखू शकतो. म्हणूनच कोणत्याही आजाराची मूळ करणे ही आपल्या रोजच्या जीवनशैलीशीच निगडित असतात.


Regards

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या