स्वतःवर प्रेम करा

स्वतःवर प्रेम करा


आजकालच्या धावपळीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनात बरेच जण आपल्या रोजच्या कामात खूप व्यस्त असल्यामुळे स्वतःकडे फारसे लक्ष देण्यास त्यांना वेळच मिळत नाही, मात्र जसे आपण आपल्या कामावर प्रेम करतो तसेच स्वतःवर प्रेम करणे अत्यंत गरजेचे आणि महत्त्वाचे आहे, पण हे नेमके कसे करावे ते आपण आता जाणून घेऊया.


स्वतःवर प्रेम करा

स्वतःवर प्रेम करा

सर्वप्रथम आपण स्वतःला जसे आहे तसे स्वीकारून स्वतःवर प्रेम करायला सुरूवात केली पाहिजे ह्यासाठी सर्वप्रथम आपण आपल्याला इतरांकडून जशा वागणूकीची अपेक्षा असते तशी वागणूक  सर्वप्रथम स्वतःला द्यायला सुरवात केली पाहिजे. नेहमी  स्वतःच्या आसपासचे वातावरण शांत आणि प्रेमपूर्वक ठेवा. स्वतःवर प्रेम करा हे जरी मी आता तुम्हाला अगदी सहजपणे सांगत आहे पण ते करणेही तितकेच कठीण देखील आहे.  कारण तुम्ही जेव्हा स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्हाला नुकसान पोहचवणाऱ्या प्रत्येक गोष्टीपासून सर्वप्रथम दूर  राहायला पाहिजे, जसे की  सुस्त जीवनशैली, वाढलेले वजन, अतिविचार करण्याची सवय, बिघडलेले नातेसंबंध, मद्यपान-धुम्रपानाची सवय, इत्यादी.

नवीन लाईफस्टाईलची सवय लावा
१. बऱ्याच जणांना खेळायला आवडते अशा लोकांनी खेळ आवडत असेल तर खेळा. जिमला जा. त्यामुळे फिट राहण्यास मदत होईल. व्यायामामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होईल.
२. साधारण प्रत्येक २ तासाने काहीतरी हेल्दी खाण्याची स्वतःला आवर्जून सवय लावा.
३. दिवसभरात जमेल तेंव्हा जास्तीतजास्त पाणी प्या.
४. सगळ्यात महत्वाचे म्हणजे परिस्थिती कशीही असो नेहमीच त्यातून सकारात्मक काय घडले ह्याचा नेहमी विचार करा.

५. संतुलित आहाराची स्वतःला जाणीवपूर्वक सवय लावा.

 

तणावापासून दूर रहा

नेहमी वर्तमानात जगा. तुम्हाला जर खूप अधिक विचार करण्याची सवय असेल तर तुमची अस्वस्थता वाढून इतर काही मानसिक आजार होऊ शकतात म्हणूनच तणावावर मात करण्याचा सोपा उपाय म्हणजे रोज योगसाधना, ध्यान करा. स्वतःचा आनंद इतरांवर अवलंबून न ठेवता स्वतःला आणि इतरांना नेहमी प्रेरणा देत रहा. कायम विनम्र आणि दयाळू राहा तसेच नेहमी दुसऱ्यांची मदत करा आणि सर्वात महत्वाचे इतरांना माफ करायला शिका. सकारात्मक विचारांनी स्वतःचे आणि इतरांचे आयुष्य प्रेरित करा.


Regards


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

Post a Comment

0 Comments