हसण्याचे फायदे!

मनमोकळेपणाने हसण्याचे  फायदे!


हल्लीच्या धावपळीच्या जीवनात ठिकठिकाणी लाफ्टर क्लबचे वाढते प्रस्थ तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल. 
Benefits of laughing.,
हसण्याचे  फायदे!
ह्याचे मुख्य कारण  हसण्यापासून मिळणारे फायदे आहेत. आजच्या वाढत्या स्पर्धेमध्ये व्यायामाबरोबरच आरोग्यासाठी हसणे देखील अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. 
हसल्याने आरोग्य चांगले राहून चेहराही उजळतो आणि आपल्या सौंदर्यातही भर पडते. 'लॉफ्टर इज द बेस्ट मेडिसिन', हे तर आपण ऐकलेच असेल तर मग जाणून घेऊया. मनमोकळेपणाने हसण्याचे फायदे...

१. मोठ्याने हसल्याने शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारतो.

२. हवामानात बदल होऊन बऱ्याच लोकांना सर्दी आणि खोकला वरचेवर होत असतो हसण्याने इम्युनिटी सिस्टम मजबूत होऊन आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

३. आजकाल बरीच कामे ही एकाच जागी बसून होत असल्याने बॉडी पेन असणाऱ्यांना हसण्याने सुटका मिळू शकते. मेडिकल प्रयोगातून असे सिद्ध झाले आहे की, १० मिनिटे मनमोकळेपणाने हसल्याने शांत झोप लागते.

४. आजकालच्या व्यस्त आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे नकारात्मक विचार, भावना लगेच येतात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाण्याची शक्यता अधिक वाढते. हसल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ लागतो आणि परिणामी आपण आपल्या कामामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. हसण्याचा परिणाम आपल्या वयावरही दिसून येतो. हसणे ही एक प्रकारची स्ट्रेचिंग एक्ससाईज आहे. हसल्याने चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि अंटी एजिंगला मदत होते.

५. संशोधनानुसार असे सिद्ध झाले आहे की हसल्याने कॅलरीज बर्न होण्यास मदत होते तसेच स्थुलताही  कमी होण्यास मदत होते.


६. हसल्याने श्वसनक्षमता सुधारून श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी वाढण्यास मदत होते. त्यामुळे शरीराला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळून शरीराची दिवसभर एनर्जी लेव्हल चांगली राहते. 
Regards

https://goo.gl/yext7G 

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या