झोपेचे नेमके महत्व काय आहे?

नेमकं झोपायचं तरी किती वेळ? 


आपल्या चांगल्या आरोग्यासाठी झोपेचं आपल्या आरोग्यात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे हे सर्वच जण जाणतात. 
झोपेचे नेमके महत्व काय आहे?
झोपेचे नेमके महत्व काय आहे?

झोप ही प्रत्येकाला आवश्यक आहे, पण किती तास झोपावे हे पण येथे समजून घेणे आवश्यक आहे.
झोपेचं योग्य प्रमाण काय, हे मात्र कोणी फारसे मनावर घेत नाहीत त्यामुळे कोणत्याही आजाराची मूळ सुरवात ही अनियमित झोपेपासूनच होते. यामुळेच यासंदर्भात तज्ज्ञांनी हल्लीच्या जीवनपद्धतीनुसार  नेमकं किती तास झोपायचं हे शोधून काढलं कमी आणि जास्त झोपेमुळे आपल्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो ह्यांचादेखील सखोल अभ्यास केला गेला.
ह्या संशोधनात असे लक्षात आले की आजच्या जीवनपद्धतीनुसार मुळात झोप पूर्ण का होत नाही हे पाहणंदेखील आवश्यक आहे. त्यासाठी अनेक करणे आहेत. टेन्शनमुळे , कामाच्या अति कामामुळे, बाहेर प्रत्येक क्षेत्रात असलेल्या स्पर्धेमुळे आज बऱ्याच लोकांना झोपेच्या समस्या आहेत. याउलट परिस्थिती म्हणजे काही लोक गरजेपेक्षा जास्त झोप घेतात. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की, तुम्ही कमी झोपत असाल किंवा जास्त झोपत असाल तरीही ते आरोग्यासाठी चांगले नाही. त्यासाठी त्यांचा सल्ला आहे की प्रत्येकानं रोज सात ते नऊ तास एवढी झोप घेतली पाहिजे. त्यापेक्षा फार कमीही नको आणि जास्तही नको असे त्यांचे म्हणणे आहे. 

महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जास्त किंवा कमी झोपत असलात, तरी त्यामुळे कालांतराने शरीरावर होणारे दुष्परिणाम जवळपास सारखेच आहेत. पण जे कमी झोपतात, त्यांच्यावर कालांतराने होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता मात्र जास्त आहे. हल्लीच्या स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे आणि खासकरून अनियमित झोपेमुळे सर्वात महत्त्वाचा त्रास हा हृदयाला होतो. त्यामुळे हृदयविकार बळावण्याची शक्यता जास्त असते. डायबेटिस, लठ्ठपणा, वजनवाढ आणि मानसिक त्रास अशाही गोष्टी घडू लागतात. त्यामुळे शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे, आपली झोप ‘योग्य’ तेवढीच ठेवा आणि आपलं आरोग्यही सुदृढ राखा. तसेच येथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आज संपूर्ण जगभरात साधारण ७०% लोक हे चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारी पडत आहेत.Regards


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com 
Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या