हायपर टेन्शनपासून सुटका हवीय?

हायपर टेन्शनपासून सुटका हवीय?


सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत बरेच जण ताण तणाव सहन करत आहेत. उच्च रक्तदाब ही समस्या सध्या बऱ्याच लोकांमध्ये आढळून येत आहेत. ह्या अशा हायपर टेन्शनला नियंत्रणात ठेवणे हे खूपच गरजेचे आहे.
हायपर टेन्शनपासून सुटका हवीय?

हायपर टेन्शनपासून सुटका हवीय?

नियमित व्यायाम

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल तर दररोजचा व्यायाम 
करणे खूपच गरजेचे आहे. नियमितपणे शारीरिक हालचाली केल्यामुळेरक्तदाबाचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकतो. चालणं, 
जॉगिंग करणं, धावणं, पोहणं, सायकल चालवणं ह्यापैकी कुठलाही व्यायाम प्रकार नियमित केल्यास ते आपल्या शरीरास हितकारक 
ठरू शकते. त्यामुळे आपल्या ऊंचीप्रमाणे आपलं वजन यांचा योग्य समतोल राखणं सोप्पे होऊन जाते.

नियमित  मसाज  
पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा संबंध शरीराचा 
मसाज केल्यामुळे स्नायू शिथिल होण्यास आणि  शरीराला एक 
आरामदायी अनुभव मिळण्यास खूप मदत होते.

चिंतन  
जितका वेळ आपण आपल्या इतर कामांना देतो त्यातच थोडा वेळ काढून जर आपण रोज निदान ५ मिनिटे  डोळे मिटून शांत बसून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर मानसिक समतोल राखणं सोपं जातं. विचारांचा गोंधळ कमी व्हायला खूपच मदत होते व मनस्थिर व्हायला मदत होते. 

शांत झोप गरजेची  
सध्याच्या स्पर्धात्मक जीवनात शारीरिक आणि मानसिक 
आरोग्यासाठी झोपेची भूमिका खूप महत्त्वाची आहे. रात्रीची साधारण ६ ते ८ तास शांत झोप मिळाली तर सगळ्या चिंता दूर होण्यास आणि ताणहलका होण्यास मदत होते. रिलॅक्स होण्यासाठी दीर्घ 
श्वसनाचे व्यायाम प्रकारही फायदेशीर ठरतात.

मीठावर ठेवा नियंत्रण
बहुतेकजण हल्ली गरजेपेक्षा जास्त प्रमाणात मीठाचं सेवन करतात. जर आपल्या आहारातील मिठाचे  प्रमाण अल्प असेल तर रक्तदाब वाढत नाही व तो नियंत्रणात राहण्यास मदत होते.

मौल्यवान जीवनसत्त्वांचं मूल्य 
आपल्या रोजच्या आहारातून आपल्याला कॅल्शिअम, मॅग्नेशियम, 
पोटॅशियम,'क' जीवनसत्त्व, ओमेगा-३ हे घटक कायम मिळाले तर आपल्या रक्तदाबाची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 
ह्यांच्या योग्य प्रमाणासाठी तुम्ही वेळोवेळी आहार तज्ञाचा सल्ला 
घेऊ शकता.

Regards

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या