चिंतन करा मन लावून
हल्ली
बरेच जण टीव्ही, कम्प्युटर आणि मोबाइल फोन मध्ये बिझी असलेले दिसून येतात. त्यामुळे
बऱ्याचदा आपण स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू शकत नाही किंवा स्वतःशी संवाद साधत नाही.
जर आपल्याला खरंच आनंदी जीवन जगायचे असेल तर आपल्याला आपल्यासाठी वेळ काढणं हे अधिक
महत्त्वाचं आहे. आपल्या दिवसभराच्या कामातून स्वतःला बाहेर काढणं आणि अंतर्मनातील शांततेशी
स्वतःला जोडून घेणं ही काळाची गरज बनली आहे.
शांतता अनुभवा
ह्यासाठी आपण ध्यान करायला शिकले पाहिजे. आपले हात
मांडीवर किंवा बाजूला ठेवून शांत बसा. डोळे बंद करून हळूहळू हलका व सहज श्वास घ्यायला
सुरुवात करा आणि तुमचे संपूर्ण लक्ष्य श्वासांवर केंद्रित करा. श्वास सहज घ्या, सर्वसाधारणपणे
जसा श्वास घेता तसाच घ्या. असे साधारण ५ मिनिटे करा. डोळे बंद करून तुमच्या नैसर्गिक
श्वासावर लक्ष केंद्रित करा. ह्यामुळे एक गोष्ट अशी घडली की तुमचं मन शांततेच्या खोल
स्थितीत जाण्यास सज्ज झालं. चिंतनाच्या सरावामुळे जो अमर्याद परमानंद मिळतो, त्याचा
एक अंदाज या सहज आणि सोप्या प्रकाराने सहजच लक्षात येतो. जसजसे तुम्ही नियमित ध्यानधारणा
करता तसतसा तुमच्यातील उत्साह, जीवनशक्ती, प्रसन्नता आणि शांतता पुनरुज्जीवित होते. जेव्हा
तुम्ही तुमचे संपूर्ण लक्ष अंतर्मनावर केंद्रित करता तेव्हा तुम्हाला अध्यात्मक
जागृतीचं आकलन होतं.
ध्यानधारणेसाठी सूचक
सराव
१. एखादी योग मॅट जमिनीवर ठेवून पद्मासनाच्या स्थितीत
बसा. बसण्याची स्थिती साधी मांडी घातलेलीही चालेल किंवा जर मॅट उपलब्ध नसेल तर ताठ
खुर्चीचाही वापर करता येईल.
२. डोळे बंद करून मनात कोणतेही इतर विचार न आणता मन
जास्तीत जास्त शांत ठेवा. पाठीचा कणा सरळ, छाती फुलवून व पोट आत अशा स्थितीत बसा. दीर्घ
श्वास घ्या व सोडा. हे साधारण तीन वेळा करा.
३. तुमचा ध्यानधारणेचा सराव सुरू करा आणि अशाच शांत
स्थितीत बसा. ह्यामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक
अंतर्मनाच्या स्वास्थ्य आणि बळकटीसाठी प्रार्थना म्हणा किंवा सकारात्मक विचारांचा
प्रवाह वाढवण्यासाठी स्वतःला पुनःपुन्हा होकारार्थी सूचना द्या.
ह्या
आणि अशा प्रकारे जर आपण रोज सराव केला तर आपण नक्कीच आपले मन खंबीर ठेवू शकतो. ध्यानधारणेसाठी
स्वतःची एक फिक्स जागा निवडा आणि शक्यतो आपली जागा बदलू नका. रोज त्याच जागी मेडिटेशन
करा जेणेकरून त्याजागी एक सकारात्मक चुंबकीय ऊर्जा निर्माण होईल आणि तुमचे मन नेहमीच
शांत चित्ताने ह्याकडे वळेल.
Regards
![]() |
चिंतन करा मन लावून |
Visit our
website: www.livewellfitnesssolutions.com
0 Comments