जेवण टाळणे अतिशय घातक का?

जेवण टाळणे अतिशय घातक का?  

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये बरेच जण ब्रेकफास्ट करत नाहीत, किंवा दुपारचे जेवण करत नाहीत किंवा लेट करतात. पण जेवण टाळण्याची सवय ही आपल्या आरोग्यास नुकसान करू शकते. जेवण टाळल्याने शरीराला काही फायदा होत नाही उलट त्याचे दुष्परिणाम होतात. तर काही जण वजन कमी करण्यासाठी जेवण टाळतात.

इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब

जर आपण जेवण उशिरा केले तर इन्सुलिनच्या प्रतिसादाला विलंब होऊन मधुमेह वाढण्याचा धोका बळावतो. दुपार किंवा रात्रीचे जेवण न केल्याने रक्तामधील साखरेची पातळी वाढते. 

पोषक घटकांची कमतरता

जेवण न केल्यामुळे शरीरातून पोषक घटक कमी होऊन शरीरास आवश्यक घटकांची कमतरता निर्माण होऊ शकते. खासकरून सकाळी काहीही न खाता बाहेर पडल्याने शरीराला आवश्यकतेनुसार पौष्टिक घटक मिळत नाहीत परिणामी जास्त भूक लागते. 

अनियमित रक्तदाब वाढतो
जेवण टाळण्याचा थेट परिणाम शरीरताल शर्करेवर होऊन शरीरातील होर्मोन्सच्या प्रवाहावर होतो आणि शरीरात कमी झालेली शर्करा भरून येण्यास वेळ लागतो, यामुळे रक्तदाब वाढू शकतो.


रक्तातील शर्करा वाढत जाते

जेवण केल्याने रक्तातील शर्करेची पातळी कमी होते. यामुळे अशक्तपणा येतो शिवाय शरीराच्या सर्व अवयवंवर याचा परिणाम होतो. आहारातून मिळणाऱ्या कार्बोहायड्रेट्सचे विभाजन होऊन त्याटचे रूपांतर शरीरात होते

अपचानाचा त्रास वाढतो

बराच काळ जर पोट रिकामे राहिले तर अॅसिडचे प्रमाण वाढून अपचन तसेच पित्त अशा समस्या उद्भवतात. जेवण टाळल्याने अपचन, पोट साफ न राहणे, ढेकर येणे अशा अनेक समस्या उद्भवतात.


Regards

जेवण टाळणे अतिशय घातक का?

जेवण टाळणे अतिशय घातक का?  

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या