रस्त्यावरुन चालताना फोनवर बोलत असाल ? तर सावधान!

रस्त्यावरुन चालताना फोनवर बोलत असाल ? तर सावधान!


अलीकडील संशोधनाने असे सुचवले आहे की सेल फोनवर बोलताना रस्त्याने चालणे धोकादायक असू शकते. ह्या अभ्यासात, ५०० पेक्षा जास्त पादचा-यांवरील व्यवहारांचे निरीक्षण केले गेले कारण ते रस्त्यावरुन चालताना सेल फोनवर बोलायचे. ह्यात त्यांच्या असे लक्षात आले की असे लोकं रस्त्याने हळू चालत होते आणि त्यांचे रस्त्यावरील वाहने, सिग्नल आणि आजूबाजूच्या लोकांकडे खुपच कमी लक्ष्य होते आणि त्यातले काही लोकं तर अपघात होताना वाचले. यात काढलेल्या निष्कर्षांवरून असे सुचविण्यात आले की रस्त्यावर चालताना सेल फोने वापरणे धोक्याचे आहे.
इथे जर आपण पाहिले तर फक्त ५०० लोकांवर हे संशोधन करण्यात आले पण खरे पाहायला गेले तर रस्त्यावरुन चालत असतांना अनेकांना मोबाईलवर बोलण्याची सवय असते. आपल्याच आजुबाजुला आणि आपल्या समोर अशा अनेक घटना घडत असतात तरी अशा लोकांचे त्याकडे नीट लक्ष्य नसते आणि ते अगदी बेसावधपणे चालत असतात. रस्त्यावरुन चालत असतांना फोनवर बोलण्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशामुळे मोबाईल चोरीच्या घटनाही खूप वाढलेल्या दिसून येत आहेत.
मुंबई सारख्या शहरात रस्त्यावरून चालताना मोबाइलवर बोलणाऱ्यांची मोबाइल चोरी आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
अनेकदा तर कानाला हेडफोन लावून गाणे ऐकत चालण्याची सवय अनेकांना असते. अशा वेळेत दुर्घटना होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. अनेक घटना तर आपण आपल्या डोळ्यांसमोर देखील पाहिल्या असतील. त्यामुळे रस्त्यावरुन चालत असतांना मोबाईलवर बोलणे टाळलं पाहिजे. मोबाइल आज खूपच महत्वाचे साधन असले तरी त्याचा किती आणि कसा आणि कुठे वापर करावा हे आपणच नीट ठरवले पाहिजे.


Regards

रस्त्यावरुन चालताना फोनवर बोलत असाल ? तर सावधान!

रस्त्यावरुन चालताना फोनवर बोलत असाल ? तर सावधान!

 

(Image From) https://goo.gl/bk4ZGf

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या