लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

लठ्ठपणा घालविण्याचे सोपे उपाय

जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स पक्का असेल तर तुम्ही कुठलीही लढाई नेहमीच पहिल्या वेळेस  जिंकल्यातच जमा होते. तुमची इच्छाशक्ती जर प्रबल असेल तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. हा नियम आपल्या आयुष्यात सर्वच बाबतीत लागू होतो तसेच तो वजन कमी करण्यासाठीही लागू होतो कारण वजन वाढीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर स्वरूप घेत आहे. त्यामुळे शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा नियमितपणा खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रयत्नांत सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजलेच पाहिजे. तसेच त्याची नोंदही ठेवली पाहिजे.
डाएटिंग सुरू केल्यानंतर वजन कमी होण्याची गती सुरवातीचे दिवस जलद असते आणि नंतर मात्र ही गती थोडी मंदावते. अशामुळे कधीही निराश होऊ नये कारण आपल्या शरीरालासुद्धा अड्जस्ट व्हायला थोडा वेळ लागतो पण नंतर मात्र पुन्हा वजन कमी होऊ लागते. काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही नेहमी जागरूक असले पाहिजे. पाणी जास्त प्यावे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान 8-10 ग्लास पाणी प्याले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भूकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टोमॅटो, मुळा, गाजर, काकडी, पत्ताकोबी यांचा समावेश असावा. यात कमी कॅलरी तर असतात तसेच आवश्यचक जीवनसत्वेही असतात. 
जेवण करताना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रित करावे आणि मोबाइल, टीव्ही शक्यतो पाहू नये. वजन कमी करताना आपल्या मित्रांशी स्पर्धा न करता स्वतःशीच करा आणि पहा की मी काल कसा होतो आणि मी आज कसा आहे ह्याची कायम नोंद ठेवा कारण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीज खर्च होत नाहीत. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत अगोदर तज्ज्ञांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करून घ्या.

Regards


 

(Image From) https://goo.gl/o9bUF3

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the inquiry: https://goo.gl/Wib57C


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या