फिट आणि हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स...

फिट आणि हेल्दी राहण्यासाठी खास टिप्स...

जागतिक आरोग्य संघटनेच्या एक अहवालानुसार आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत कमी वयात  आजारांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. तसेच संशोधनातून हेही समोर आले आहे की याला आपली बैठी, बदललेली जीवनशैली, अवेळी खाणे, अपूरी झोप, इंटरनेटचा अधिक वापर अशा अनेक सवयी कारणीभूत आहेत. त्याचबरोबर ताण-तणाव, स्पर्धा या गोष्टींचीही त्यात भर पडते. अशावेळी स्वतःला फिट ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. यासाठी दिवसातून थोडा वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे.

शरीराला आराम द्या 

आपले जीवन कितीही व्यस्त असले तरी आपण वेळेवर झोप घेणे आवश्यक आहे कारण व्यस्त जीवनशैलीमुळे अनेकदा आपली झोप पूर्ण होत नाही. त्याचा परिणाम शरीर-मनावर आपल्या कार्यक्षमतेवरही होत असतो. त्यासाठी वेळ असेल तेव्हा शरीराला आराम द्या.

तणावाला करा बाय-बाय 

ताण तणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे आणि ह्याचे जर प्रमाण वाढले तर अनेक शारीरिक-मानसिक समस्या उद्भवतात. त्यामुळे ताण हाताळायला शिका. त्यासाठी योगसाधना, ध्यानधारणा तुम्ही करू शकता.

ऑफिसमध्ये असतानाही शरीराकडे लक्ष द्या 

आजच्या जमान्यात सर्वच कामे ही कॉम्पुटरसमोर बसूनच केली जातात म्हणूनच तुमच्या बसण्याची स्थिती तपासा. खुर्चीवरून थोड्या वेळाच्या अंतराने उठून फिरत जा. डोळ्यांवर पाणी मारा. वेळेवर जेवा. भरपूर पाणी प्या.

स्वतःवर विश्वास ठेवा 

आपल्या आयुष्यामध्ये बरीच अशी कामे आहेत जी आपल्यासमोर आव्हान उभे करतात त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत करा. पण त्याचा ताण येऊ देऊ नका. तसंच स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःला कमी किंवा कमजोर समजू नका.

सकारात्मक विचार 

सर्वात महत्त्वाचे आहेत कोणताही प्रसंग असला तरी सकारात्मक विचार करणे आणि हे असे का घडले ह्याचा नीट शांत मानाने विचार करणे. त्यामुळे तुम्ही स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगू शकता. जीवनाला दिशा देऊ शकता. त्यामुळे वेळीच सकारात्मक विचारांचे महत्त्व जाणा आणि त्याची सवय लावून घ्या.


Regards


(Image From) https://goo.gl/tUqY4R   

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या