'या' टिप्सने ऑफिसमध्येही राखा तुमचे आरोग्य!

'या' टिप्सने ऑफिसमध्येही राखा तुमचे आरोग्य!


सध्याचे जीवन हे खूपच धावपळीचे आणि स्पर्धात्मक आहे, ह्याच अशा जीवनशैलीमुळे आपल्याला आपले आरोग्य सोडून इतर सर्व गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ आहे. आजच्या जमान्यातील खूप मोठा वर्ग हा दिवसाचे ८-१० तास ऑफिसमध्ये  कंम्प्युटर स्क्रिनसमोर बसून काम करणारा आहे. ऑफिसचे काम संपले की मग मोबाईल मध्ये सोशिअल मीडियामध्ये रमणारा आहे.  इकतंच काय तर घरी जेवत असतानाही मोबाईल आणि टी.व्ही बघण्याचे प्रमाण वाढले आहे या अशा जीवनशैलीमुळे खूप लोकांच्या आरोग्याचे नुकसान होत आहे आणि ह्यामुळेच एक मात्र गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे, आपले शरीर आजारांचे घर तर होणार नाही ना? ताण-तणाव, नैराश्य, उच्च रक्तदाब, मधुमेह यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी काही खास टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे.

कामातून मध्ये मध्ये ब्रेक घ्या
हल्ली जर आपण पहिले तर बऱ्याच ऑफिस मध्ये ५ दिवसांचा कामाचा आठवडा असल्याने कामाचे ९ तास झाले आहेत. पण बऱ्याचदा हे ९ तास वाढून १०-११ तास सहज होतात. त्यामुळेच आपल्या कामाच्या वेळी मध्ये मध्ये ब्रेक घेणे गरजेचे आहे. ब्रेक घेऊन ऑफिसमधून बाहेर जरा मोकळ्या हवेत फिरले पाहिजे. लिफ्टऐवजी जिन्यांचा वापर केला जर खूपच चांगले होईल कारण सतत बसून राहिल्याने शरीरातील चरबी वाढते आणि शरीर आखडते.


डोळ्यांची काळजी घ्या 

आजकाल सर्वच कामे ही कॉम्पुटर समोर बसून केली जातात आणि दिवसातला उरलेला बराच वेळ मोबाईल पाहण्यात  आणि टी.व्ही. स्क्रिनसमोर जातो. त्यामुळे डोळ्यांचे विविध त्रास जाणवू लागतात. पण अशा वेळी ब्रेक घेऊन डोळ्यांना आराम दिला पाहिजे. केंव्हाही बाहेरून आपल्यावर नेहमी डोळ्यांवर पाणी मारून डोळे साफ करण्याची स्वतःला सवय लावली पाहिजे.

आहारात फळांचा समावेश करा 

आपल्या आजच्या जीवनशैलीमुळे जेवणाचे, खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत. तसेच चहा-कॉफीचे अधिक प्रमाणात सेवन व्हायला लागले आहे. म्हणून काहीही गंभीर होण्याची वाट न पाहता  आतापासूनच वेळेत आणि योग्य अन्न खाल्ले पाहिजे. 

निसर्गाशी मैत्री


सध्याचे जीवन दिवसातले साधारण १२ तास ऑफिसामध्ये आणि मग उरलेला वेळ ट्रॅफिक आणि घरी, अशा प्रकारचे झाले आहे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात फारसा वेळ आपण घालवत नाही किंवा तितका वेळच आपल्याकडे नसतो. त्यामुळे ऑफिसमधून मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्या आणि मोकळ्या हवेत फिरा. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवा. 

Regards

(Image From) https://www.businessinsider.in   

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या