सोमवार, ५ फेब्रुवारी, २०१८

फिट राहण्यासाठी आता द्या फक्त ३ मिनीटं....

फिट राहण्यासाठी आता द्या फक्त ३ मिनीटं....

सध्याची बऱ्याच लोकांची जीवनशैली इतकी व्यस्त आणि गुंतागुंतीची आहे की त्यांची रोजची कामे करून मग चॅटींग करायला, गाणी ऐकायला, शॉपिंग करायला, मित्रांसोबत सिनेमा पाहायला जाणे ह्या अशा गोष्टींमध्ये सध्या आहे. पण एकाच खंत वाटते ती म्हणजे व्यायामासाठी वेळ नाही. यामुळेच कमी वयात आजारांना बळी पाडण्याचे प्रमाण वाढले आहे. ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आपण जर रोज फक्त तीन मिनीटे जरी स्वतःसाठी खर्च करु शकलो तरी नक्कीच आजारांपासून दूर राहू शकतो. 
सध्या कामाच्या व्यस्त स्वरूपामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम बऱ्याच लोकांना भोगावे लागत आहेत. त्यात ९-१० तास ऑफिसमध्ये काम केल्यावर २ तास प्रवास आणि मग घरी आल्यावर काही त्राणच राहीलेले नसतात. त्यात घरातले काही काम असेल तर मग काहीच वेळ शिल्लक राहत नाही.
हे सर्व जरी असले तरी आपले आरोग्य चांगल्या प्रकारे टिकवणे हे अतंत्य महत्त्वाचे आहे आणि ते जपण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी ऑफिस आणि घरी अगदी सहज करता येण्यासारखे प्रकार आहेत. जाणून घेऊया नेमके काय करायचे तेः

१. आजकाल सगळ्याच ठिकाणी लिफ्ट असते पण चांगल्या फिटनेससाठी लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करा. त्यामुळे शरीर अॅक्टीव्ह होईल. 
२. सतत ८ ते १० तास बसून काम करत असाल तर थोड्या वेळाने उठून फिरा. फोनवर बोलताना खुर्चीवर बसून न बोलता चालत बोला.
३. एकाच वेळी भरपूर न खाता थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने थोडे थोडे खा.
४. आपल्या आहारात फास्ट फूड ऐवजी फळांचा समावेश करा. हंगामी फळे खा.
५. जर सतत चहा प्यायची सवय असेल तर ती जाणीवपूर्वक कमी करा.
६. ऑफिस वर्क करताना खुर्चीवर बसून थोड्या वेळच्या अंतराने  शक्य तेवढे स्ट्रेचिंगचे व्यायामप्रकार करा. मान-पाठ उजवीकडे डावीकडे वळवा.
७. दुपारी जेवण झाल्यावर झोप येत असेल तर चहा किंवा कॉफी पिण्यापेक्षा डोळ्यांवर थंड मारा.


Regards


 

(Image From) https://goo.gl/zmiDJD

Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract?

पचनसंस्थेची काळजी कशी घ्याल | How do you take care of the digestive tract? खालील लिंकवर क्लिक करून आमच्या यूट्यूब चॅनेल...