रोज एक केळं खाण्याचे फायदे...

रोज एक केळं खा आणि मिळवा अनेक फायदे...

आपण लहान पणापासूनच ऐकत आलोय की नेहमी फळे खाल्ली पाहिजेत, आणि अशी काही फळे आज बाजारात उपलब्ध आहेत की जी वर्षाचे बाराही महिने तुम्ही खाऊ शकता आणि त्याने तुमचे आरोग्य चांगले ठेवू शकता. त्यातलेच एक फळ म्हणजे केळे जे वर्षाचे बाराही महिने उपलब्ध असते. फळे आरोग्यास लाभदायी असतात, हे आपण सर्वच जाणतो. पण कोणत्या फळाचे नेमके काय फायदे आहेत, याबद्दल फारशी माहिती आपल्याला नसते. तसेच ह्या केळ्यांबद्दल काही गैरसमज आपल्याकडे आहेत. केळ्यामुळे वजन वाढते. पण केळं अनेक प्रकारे फायदेशीर आहे. जाणून घेऊया केळ्याचे आरोग्यास होणारे फायदे....

तणाव होईल दूर

संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, केळ्याचे सेवन केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. उदास प्रवृत्ती दूर होऊन ह्यातील व्हिटॉमिन बी मुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी सुरळीत राहण्यास मदत होते.

 

अॅनेमियावर फायदेशीर

सर्वसाधारण आपल्या सर्वांना हे माहित आहे की अॅनेमिया म्हणजे शऱीरात हिमोग्लोबीनची कमतरता होणे. केळे खाल्याने शरीरात आर्यनची कमी हळूहळू भरून निघेल आणि अॅनेमियाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

 

ताकद वाढवण्यासाठी

केळ्यामुळे शक्ती मिळते. रोज दूधासोबत एक केळे खाल्यास काही दिवसाताच शरीर धष्ट पुष्ट होईल.

 

कोरड्या खोकल्यावर आराम 

कोरडा खोकला असल्यास केळ्याचं ज्यूस पिणे फायदेशीर ठरते.


पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी

आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना वेळेवर जेवता येत नाही अशामुळे बऱ्याचदा पचनक्रिया बिघडते आणि मोशनही नीट होत नाही पण जर केळे खाल्ले तर त्यात असलेल्या फायबर्समुळे पचनक्रिया सुरळीत होते. पचनक्रिया सुरळीत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहता.

रक्त सुरळीत करण्यासाठी 

आजकाल बऱ्याच लोकांना कोलेस्ट्रॉलच्या समस्यांनी ग्रासलेले आहे आणि ह्यात मुख्य म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात आणि रक्तप्रवाह नीट होत नाही अशा वेळेस जर केळं खाल्ले तर रक्तवाहिन्यातील रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील रक्तसंचार सुधारतो. केळ्यात असलेल्या मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. 


Regards 

(Image From) https://goo.gl/Dd6usX


Visit our website: www.livewellfitnesssolutions.com

Fill the following link for the enquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या