गरम पाणी पिण्याचे महत्त्वपूर्ण फायदे!

गरम पाणी पिण्याचे महत्त्वपूर्ण फायदे!  


आपल्या शरीराचे निरोगी कार्य राखण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे. आपल्याला हे तर माहीतच आहे की आपल्या शरीरात असलेल्या साधारण ७२% पाण्यामुळेच शरीरावरील आकारावर अवलंबून आहे. तसेच, पाण्याचा पुरेसा वापर केल्यास आरोग्यासाठी असंख्य आरोग्य फायदे मिळतील जसे डोकेदुखीचा उपचार, मूडमध्ये सुधारणा, थकवा दूर करणे, पचन सुधारणे आणि बद्धकोष्ठता इत्यादि.
हे तर झाले नॉर्मल पाणी पिण्याचे फायदे पण गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. रोज सकाळी १ ग्लास गरम पाणी प्यायल्यास पोटावरची चरबी कमी होते. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर होतात. जाणून घेऊया आयुर्वेदानुसार, गरम पाणी पिण्याचे काही फायदे... 

पोटावरची चरबी कमी होते

आजकालच्या बैठ्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना पोटावरच्या वाढलेल्या फॅट्सने ग्रासलेले आहे पण जर रोज गरम पाणी प्यायले तर अतिरिक्त फॅट बर्न होण्यास खूपच मदत होते. त्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.

पचन सुधारते

रोजचे किमान १० ते १२ तास कॉम्पुटरसमोर बसून काम आणि ह्याच कामाच्या टेन्शनमध्ये बऱ्याच लोकांचे जेवण वेळेवर होत नाही आणि त्यामुळे आपोआपच डायजेशनच्या समस्या निर्माण होऊ लागतात पण जर रोज नियमितपणे गरम पाणी प्यायले तर खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होते. पचनक्रिया सुरळीत होते. अर्थातच ह्याला व्यायामाचीही जोड हवी.

सर्दी-खोकल्यावर परिणामकारक

हल्लीच्या जीवनशैलीमुळे बऱ्याच लोकांना लो इम्युनिटीच्या समस्या होत आहेत, जसे की जरा काही हवामानात बदल झाला तर लोकांना सर्दी-खोकल्यासारखे आजार होतात परंतु नियमित गरम पाणी प्यायल्याने शरीरात योग्य प्रमाणात उष्णता कायम राहते. यामुळे सर्दी-खोकल्यासारखे आजार दूर होण्यास मदत होते.

अस्थमावर नियंत्रण

रोज गरम पाणी प्यायल्याने घशातील कफ निघून जाऊन अस्थमावर नियंत्रण मिळवता येते.

मसल्स पेन कमी होते

गरम पाण्याच्या पिशवीने जर अंग शेकले तर आपल्याला नेहमीच बरे वाटते तसेच जर नियमित गरम पाणी प्यायले तर ब्लड सरक्यूलेशन सुधारते. त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ब्लड पोहोचून मसल्स पेन दूर होते. 

Regards

गरम पाणी पिण्याचे महत्त्वपूर्ण फायदे!

गरम पाणी पिण्याचे महत्त्वपूर्ण फायदे! 

 

(Image From) https://goo.gl/VD15p9

Fill the following link for the inquiry:  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या