अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे


आजची जीवनशैली ही खूपच धावपळीची आहे. जिकडे बघावे तिकडे लोकं त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत. ह्या आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येक जण धडपड करत आहे आणि त्यातील बरेच जण आता आरोग्यासाठी जागरूक देखील आहेत. पण असेही काही लोकं आहेत जे कळत नकळत काही गोष्टींचे जास्त रिपीटेशन करत आहेत आणि ह्यामध्ये एका संशोधनानुसार जे लोकं जास्त कॉम्पुटर समोर बसून काम करतात त्यांचा जास्त समावेश आहे. ह्यातील बरेच जण आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी एका गोष्टीचे जास्त सेवन करतात आणि ते आहे चहा. चहा जर प्रमाणात प्यायला तर चांगले पण जर त्याचे सेवन प्रमाणापेक्षा जास्त झाले तर ते नक्कीच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. तज्ज्ञांचे नेहमीच असे म्हणणे असते की कुठलीही गोस्ट करा पण ती प्रमाणात करा!!! 
भारतासारख्या देशात दिवसाची सुरवात ही सकाळच्या चहानेच होते. अनेकांसाठी चहा हे एक अमृत आहे आणि दिवसाची सुरवात एका चांगल्या एनर्जीने करण्याचे मुख्य पेय आहे. पण दिवसातून दोनवेळा चहा पिणे ठीक समजले जाते. मात्र काहीना दिवसातून चार ते पाचवेळाहून अधिक चहा पिण्याची सवय असते. मात्र ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. अधिक चहा प्यायल्याने आरोग्याचे नुकसान होते.


अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

१. जर दिवसभरात तीनपेक्षा जास्त कप चहा प्यायलास कालांतराने अॅसिडिटीचा त्रास सुरु होतो.

२. आपली पचनक्रिया जर चांगली असेल तर आपण लाइफ स्टाइल डिसीजना सहज दूर ठेवू शकतो, पण अधिक चहा प्यायल्याने आपल्या डायजेशन सिस्टम मध्ये अडथळा येतो आणि आपोआपच लाइफ स्टाइल डिसीजना आमंत्रण मिळते.

३. प्रत्येक व्यक्तीला आपली स्माईल छान असावी असेच वाटते पण जर चहाचे अधिक सेवन झाले तर कालांतराने दातांवर डाग येतात.

४. जर रात्री झोपण्यापुर्वी चहा प्यायल्यास निद्रानाशचा त्रास संभवू शकतो.

५. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होत असेल अशा व्यक्तींनी चहा पिऊ नये.

Regards

अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

अधिक चहा पिण्याचे हे आहेत तोटे

 

(Image From) https://goo.gl/VD15p9
Fill the following link for the inquiry:  

https://goo.gl/Wib57C

खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या