सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे!

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे! 


आपल्या शरीराचा ७२% भाग हा पाण्याने व्यापलेला आहे, हे आपण अनेक ठिकाणी वाचले आहे तसेच आपल्या आरोग्याचे स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी आणि फिट राहण्यात पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे रोजच्या रोज आपल्या शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे. साधारण २० किलोला १ लिटर पाणी प्यावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यावरून आपण आपला पाणी पिण्याचा अंदाज सहज लावू शकतो. जेंव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा शरीराला पाण्याची गरज अधिक असते. यासाठी सकाळी उठताच २ ते ३ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. सकाळी उपाशीपोटी पाणी प्यायल्याने अनेक फायदे होतात.


१. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिन्स शरीराबाहेर फेकले जातात. तसेच रक्त शुद्ध होते.

२. आपल्या शरीराचे तापमान हे नेहमीच रूम टेम्परेचर प्रमाणे बदलत असते अशा वेळेस सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान नियंत्रित राखले जाते.
३. हल्लीच्या लाइफ स्टाइलमुळे लो इम्युनिटीचे प्रमाण बऱ्याच लोकांमध्ये वाढलेले दिसते म्हणूनच आपल्या शरीराची इम्युनिटी वाढण्यासाठी पाणी महत्त्वाचे आहे. पाणी प्यायल्याने शरीराची इन्फेक्शनशी लढण्याची क्षमता वाढते.

४. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने डोकेदुखी, अंगदुखी, हृदयाचे आजार, लठ्ठपणा, अस्थमा, टीबी, किडनीचे आजार, गॅस, डायबिटीज, डायरिया, पाईल्स, कॅन्सर, बद्धकोष्ठता, डोळे, कान, नाक आणि घश्याचे आजार दूर होण्यास मदत होते.

५. रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने पाचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते.

६. वजन कमी करायचे असल्यास सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यावे.

७. सकाळी उठून रिकाम्या पोटी पाणी प्यायल्यास घश्याचे आजार, मासिक पाळी, डोळ्यांचे, आणि किडनीसंबंधित आजार दूर होतात.


Regards

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे!

सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे भरपूर फायदे! 

 

Fill the following link for the inquiry:  

https://goo.gl/Wib57Cखालील लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचे पुस्तक नक्की वाचा: 


आमचे खालील ब्लॉग नक्की वाचा:

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या