अनियमित झोप देईल मेंदूच्या विकारांना निमंत्रण!

अनियमित झोप देईल मेंदूच्या विकारांना निमंत्रण! 


आपल्याला हे तर माहीतच आहे की आपल्या आजूबाजूला जे पण सजीव प्राणी आहेत ते नेहमीच सामान्य झोपेच्या चक्रानुसारच झोप घेतात. ही एक आपल्या जगण्यासाठी लागणारी एक यंत्रणा आहे आणि एक चांगले आयुष्य जगण्यासाठी तसेच आपल्या शरीराची ताकद राखण्यासाठी आपल्या सर्वांनाच झोपेची आवश्यकता आहे.परंतु 21 व्या शतकात बदललेल्या लाइफ स्टाइलमुळे आज बरेच लोक हे विविध आजारांनी त्रस्त आहेत. रात्री झोप न येणे, मध्यरात्री झोपेतून मधेच उठाव लागणे ह्यासारख्या साधारण तक्रारींकडे आपण जर कायम दुर्लक्ष केले तर त्याचे विपरीत परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ शकतात असं संशोधकांचं म्हणणं आहे. 

आपल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाचं रुपांतर झोप न लागणे, झोपेच्या तक्रारींत होतं, हे सगळ्यांनाच माहीत असलं तरी या दोन्ही तक्रारी एकत्र आल्यावर त्याचा परिणाम फार मोठा असतो. हळूहळू तो वाढत जातो, ही गोष्ट मात्र अनेकांना माहीत नसते किंवां त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. संशोधकांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात असं लक्षात आलं की नुसती अनियमीत झोपदेखील तुमच्या अनेक विकारांना आमंत्रण देऊ शकते. 

संशोधकांनी असेही लिहून ठेवले आहे की दीर्घकाळापर्यंत जर आपल्याला झोपेच्या समस्या असतील तर त्याचा आपल्या मेंदूवर विपरित परिणाम होतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतो. मेंदूवर परिणाम झाल्यामुळे त्याचा आपोआपच शरीरावर परिणाम होतो, तब्येतीच्या तक्रारींमुळे आजारपणांत वाढ होते. तसेच आजारपण आल्याने काही काळाने निद्रानाशाचा विकार जडतो आणि पुन्हा त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे असे एका सर्कलमध्ये चालू राहते आणि अपेक्षित योग्य परिणाम दिसून येत नाही.


अशातच हल्ली डॉक्टरही जेंव्हा एखादा पेशंट त्यांच्याकडे झोपेच्या तक्रारीची समस्या घेऊन येतो तेंव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीचा झोपेत काही क्षणांसाठी अचानक श्वास चालू किंवा बंद होतो का ते प्रथम चेक करतात आणि या दोन्ही तक्रारी जर रुग्णांत आढळल्या तर डॉक्टर स्वतःच पेशंटला योग्य ती तपासणी करण्यास सांगतात. पण झोपेच्या समस्या असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये असे नेहमीच तज्ज्ञांकडून सांगितले जाते. 


Regards

अनियमित झोप देईल मेंदूच्या विकारांना निमंत्रण!

अनियमित झोप देईल मेंदूच्या विकारांना निमंत्रण! 

 

(Image From) https://goo.gl/4SBsaS   
Fill the following link for the inquiry:  

https://goo.gl/Wib57C

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या