शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

चुकीची लाइफस्टाइल आरोग्य साठी घातक !

चुकीची लाइफस्टाइल आरोग्य साठी घातक ! 

आजची जीवनशैली ही खूपच बिझी झालेली आहे, प्रत्त्येक फिल्डमध्ये आज खूपच स्पर्धा आहे आणि ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येकजण मेहनत करत आहे. पण हेच करत असताना बऱ्याच लोकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. तज्ज्ञांच्या मते आज ५०% पेक्षा जास्त लोकांना लाइफ स्टाइल डीसीसने ग्रासलेले आहे. ह्यामध्ये बऱ्याच लोकांना दिवसभराच्या ताणामुळे  झोप डिस्टर्ब होण्याचे प्रमाण अधिक आहे आणि ह्यासाठी चुकीची लाइफस्टाइल हे एक मुख्य कारण आहे. झोपेच्या या त्रासाबाबत वेळीच काळजी घेतली नाही, तर हा विकार वाढत जाऊन नैराश्यानं ती व्यक्ती ग्रासली जाऊ शकते.

अलिकडच्या दशकांत, आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून डब्ल्यूएचओच्या एका संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की जीवनशैलीशी निगडित ६०% लोक हे चुकीच्या जीवनशैलीचे अनुसरण करतात. म्हणूनच, आजारपण, लो इम्युनिटी, कमी वयात हर्ट अटॅकने मृत्यू ओढवणे ह्यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात होऊ लागल्या आहेत. चयापचयाचे रोग, स्केलेटल समस्या, हृदय व रक्तवाहिन्या रोग, उच्च रक्तदाब, जादा वजन, हिंसा इत्यादी समस्या बऱ्याच लोकांमध्ये चुकीच्या जीवनशैलीमुळे होऊ लागल्या आहेत.

तसेच संशोधकांच्या मते स्त्रियांच्या तुलनेत पुरुष जास्त प्रमाणात लाइफ स्टाइल डीसीजने त्रस्त आहेत. ह्यामध्ये मुख्यकरून झोपेच्या तक्रारी वाढत जाऊन मोठ्या होतात आणि नैराश्यात त्याचं रुपांतर होते. तज्ञांच्यामते झोपेच्या तक्रारींकडे बिलकूल दुर्लक्ष करू नका, नाहीतर रात्रीचे जागरणं किंवा उशिरा झोपणे  तुमची झोप आणि दिवसभरातल्या इतर गोष्टींवरदेखील वाईट परिणाम करू शकते. 


कधी कधी प्रमाणाबाहेर कष्ट झाल्यामुळे झोप येत नाही, त्यामुळे झोपेच्या तक्रारी वाढतात, पण फार शारीरिक कष्ट तुम्ही करीत नसतानाही तुमच्या झोपेच्या तक्रारी सुरू झाल्या असतील, तर निद्रानाशाकडे तुमची वाटचाल होते. झोपेत काही क्षणांसाठी श्वास बंद होणे, सुरू होणे असे प्रकार सुरू होतात आणि त्यानंतर गंभीर स्वरुपाच्या नैराश्याकडे तुमची वाटचाल होऊ शकते. मानसिक आणि शारीरिक तक्रारी वाढत जातात. रात्री झोप न आल्यामुळे आपोआपच तुमची विश्रांती होत नाही आणि तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. तसेच संशोधनात असेही आढळून आले आहे की जर कुठल्याही गोष्टीचा खूप ताण असेल, तुम्ही कुठल्या विचाराने त्रस्त असाल, तुमची लाइफस्टाइल चुकीची असेल किंवा तुम्ही सातत्यानं तुमच्या काही आजारांसाठी औषधं घेत असाल तरीही तुमच्या झोपेच्या तक्रारी वाढतात आणि त्यानंतर त्या वाढत जाऊन नैराश्यात त्याचं रुपांतर होतं.

Regards

चुकीची लाइफस्टाइल आरोग्य साठी घातक !

चुकीची लाइफस्टाइल आरोग्य साठी घातक ! 

 

(Image From) https://goo.gl/ghBGfN   
Fill the following link for the inquiry:  

https://goo.gl/Wib57C

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आमचा लेटेस्ट ब्लॉग नक्की वाचा:

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder

पचनक्रिया खराब होण्याची कारणे | Causes of Digestive function disorder  सध्याच्या वेगवान जीवनातील स्पर्धेत टिकण्यासाठी आपण, विशेषतः तरुण...